देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने पावसाने हजेरी लावली असून उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाःकार माजला आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आतापर्यंत एकूण २४३.२ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पावसाची उपस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. रविवारी सकाळी दिल्लीत गेल्या २४ तासांत १५३ मिमी पाऊस पडला. या पावसाने गेल्या ४० वर्षांचा विक्रम मोडला. दिल्लीतील काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दिल्लीत पावसामुळे घराचे छत कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसात भूस्खलनामुळे वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने रस्ते बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम चारधाम यात्रेवरही होत आहे.
हे ही वाचा:
‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!
दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका
गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवला, केली रुग्णाला मदत
याशिवाय हरियाणा, चंदीगड, पंजाबमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. हरियाणा आणि पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडत असून येत्या २४ तासांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.