26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषगुजरातमध्ये पावसाचा हाहाःकार; पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

गुजरातमध्ये पावसाचा हाहाःकार; पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

३० जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

देशात काही राज्यांमध्ये पावसाने दडी मारलेली असताना दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र मुसळधार पावसाने हाहाःकार उडवला आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३० वर पोहोचली आहे. तसेच, पूरग्रस्त भागांतील १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेना, भारतीय हवाई दल आणि भारतीय तट रक्षक दलांच्या मदतीने गुजरातमध्ये बचाव कार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून गुजरातमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी ११ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर २२ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाच्या रौद्र रुपामुळे गुजरातमधील परिस्थिती भयावह असून सलग तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक घेतली. जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त आणि विकास अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला.

हे ही वाचा:

बंगळुरू विमानतळावर तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या

आर.जी. कर दुष्कृत्य प्रकरण: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया !

सोनिया-राजीव विवाह हे आयएसआयचे षडयंत्र? आरोपांपेक्षा काँग्रेसचे मौन अधिक गूढ

देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार

दुसरीकडे, दिल्ली-एनसीआरमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली असून बुधवारी संध्याकाळपासूनच दिल्ली एनसीआरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारीही दिल्लीत पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून हवामान विभागाने पुढील काही दिवस वातावरण असेच राहणार असून पावसाचा इशारा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा