कसोटी विश्वचषक अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून

कसोटी विश्वचषक अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून

साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाने बोळा फिरवला आहे. पण हे जरी असले तरी कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना हा पाच दिवसांचा होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी आयसीसीकडून एक दिवसाचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आल्यामुळे पहिला दिवस पावसाने वाया गेला असला तरीही उद्यापासून म्हणजेच १९ जून पासून पुढचे पाच दिवस हा सामना खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट रसिकांची निराशा होणार नाहीये.

तर महिला क्रिकेटमध्येही पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. भारतीय महिला क्रिकेट संघाची इंग्लंड सोबत कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. यावेळी भारतीय संघाच्या ८३ धावा झाल्या असून १ विकेट गेली आहे.

हे ही वाचा:

पुण्यात पुन्हा विकेंड लॉकडाऊन

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

रस्ते अपघातांचे प्रमाण २०२४ पर्यंत ५० टक्क्यांवर आणणार

मविआ सरकारला आता हवीय बुलेट ट्रेन…

पावसाने खेळ थांबायच्या आधी भारताची दुसरी इनिंग सुरू झाली असून २४.३ षटकांचा खेळ झाला आहे. भारताकडून खेळताना शेफाली वर्मा हिने अर्धशतक झळकावले असून ती नाबाद ५५ धावांवर खेळत आहे. तर तिला दीप्ती शर्मा ही १८ धावा करून साथ देत आहे. स्मृती मंधाना हि आठ धावा करून पाचव्या षटकात बाद झाली.

अतिशय रोमहर्षक चाललेल्या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने पहिल्या इनिंगमध्ये ३९६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय महिला संघाकडून फक्त २३१ धावा करणे शक्य झाले. १६७ धावांवर भारतीय संघाची पहिली विकेट गेल्यानंतर पुढे अवघ्या २० धावांमध्ये भारतीय महिला संघाने आणखीन ६ विकेट फेकल्या. परिणामी २३१ धावांमध्येच भारतीय महिला संघाचा ऑल आउट झाला असून त्यांना इंग्लंड संघाने फॉलोऑन दिला आहे

Exit mobile version