कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट

पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या उभय संघांमध्ये होईल. साऊदम्पटनमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या या ऐतिहासिक अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या ‘आक्रमकते’चा सामना केन विल्यमसन ‘कूल’ अंदाज करेल. संपूर्ण जगाच्या नजरा या दोन्ही तुल्यबळ कर्णधारांकडे लागल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊदम्पटनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे.

साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत जग्गजेतेपदाची गदा उंचावण्यासाठी विराट कोहली आणि केन विल्यमसन दोघेही आसुसलेले आहेत. आज दुपारी ठीक अडीज वाजता विराट आणि केन नाणेफेकीसाठी मैदानात जातील. आतापर्यंतच्या सगळ्यात प्रतिक्षेत असलेली नाणेफेक उडवली जाईल. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याला ठीक तीन वाजता सुरुवात होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सुनील गावस्करांच्या साथीला माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची कॉमेन्ट्री तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

हे ही वाचा :

अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार

येडियुरप्पा- जयंत पाटील का भेटत आहेत?

भारत न्यूझीलंड कसोटी जगज्जेतेपदाचा अंतिम सामना आजपासून रंगणार

भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु साऊदम्पटनमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टॉसला उशीर होणार आहे. निराशाजनक गोष्ट ही आहे की सामन्याच्या पहिल्या दिवशीचं पहिलं सेशनही रद्द करण्यात आलं आहे. आशा आहे लंचनंतर तरी सामन्याचं दुसरं सेशन सुरु होईल.

Exit mobile version