25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषसाऊदम्पटनमध्ये आजही पाऊस व्यत्यय आणणार?

साऊदम्पटनमध्ये आजही पाऊस व्यत्यय आणणार?

Google News Follow

Related

इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य दिवशीचा संपूर्ण खेळ पाऊस असल्यामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बऱ्याच अडथळ्यानंतर अखेर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी खेळ ६४.४ ओव्हरनंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने तोवर ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी वातावरण चांगले असल्याने भारताचा संपूर्ण डाव ९२.१ ओव्हरचा झाल्आनंतर न्यूझीलंड संघ देखील ४९ ओव्हर खेळू शकला. न्यूझीलंड ११६ धावांनी पिछाडीवर असला तरी केवळ दोनच विकेट गमावल्याने आजचा दिवस सामन्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्यातच साऊदम्पटनमधील हवामानाच्या ताज्या फोटोतून आजच्या खेळावरही पावसाचं संकट घोंगावत असल्याचं समोर आलं आहे.

दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरुहोण्यापूर्वी हवामानाची स्थिती सर्वात आधी भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक जो सद्या कॉमेन्ट्री करण्यासाठी इंग्लंडला आहे त्यानेच दिली होती. दिनेशने मैदानाचे ताजे फोटो शेअर करत तेथे सूर्य उगवला असून आजचा खेळ होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आजही दिनेशनेच मैदानाचे फोटो शेअर करत ‘हवामान तितके खास नाही’ असे कॅप्शनही दिले आहे.

हे ही वाचा:

…म्हणून मुंबईला लेव्हल ३ चेच निर्बंध लागू

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार

कोरोना नियम पायदळी तुडवल्यामुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाला अटक

योग दिनानिमित्त एम. योगा अ‍ॅप लॉन्च

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ २१७ धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने २ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या ११६ धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला ४९ षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरसआहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा