राज्यामध्ये मान्सूने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे शेतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्य वर्तवली जात असतानाच मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात पाऊस पडला आहे.
प्रदीर्घ खंडानंतर मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने कुठे तुरळक, कुठे मध्यम तर कुठे दमदार हजेरी लावली. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. या तीन जिल्ह्यांतील १४ मिळून तालुक्यांत अतिवृष्टी झाली.
मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी अधूनमधून श्रावणधारा बरसतच होत्या. औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ विभागांपैकी औरंगाबाद तालुक्यातील हर्सूल तालुक्याचा अपवाद वगळता ६१ विभागांत पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी लागली. आठ तालुक्यांत अतिवृष्टी तर ३५ विभागांत ते दमदार पाऊस झाला. इतर तालुक्यांत तुरळक ते पावसाच्या हलक्या सरी नोंदल्या गेला.
बीड जिल्ह्यातील ६३ तालुक्यांपैकी ६१ तालुकांत पावसाची हजेरी लागली. गेवराई तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. या तालुक्यातील चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील २१ तालुक्यांत मध्यम ते दमदार तर ४० तालुक्यांत तुरळक ते हलका पाऊस झाला. केजमधील दोन तालुक्यांत अजिबात पाऊस पडला नाही.
जालना जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४९ तालुक्यांत पावसाने हजेरी लागली. अंबड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यातील सातही विभागांत सरासरी ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर दोन विभागांत अतिवृष्टी झाली.
हे ही वाचा:
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?
उस्मानाबाद, लातूरला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३७ विभागांत पाऊस झाला. परंडा तालुक्यातील पाचही विभागांत पाऊस झाला नाही. पाऊस झालेल्या ३७ विभागांपैकी सात विभागांत १०.१ ते २७.८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित विभागांत पावसाची तुरळक ते हलकी हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील सर्व ६० विभागांत कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागली. १५ विभागांत १० ते २१.८ मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. इतर मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. परभणीत जिल्ह्यातही सर्वत्र रिमझिम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता.१७) दुसऱ्या दिवशीही पाऊस झाला. मंगळवारी सकाळी आठपर्यंत १७.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी अडीचपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. औंढा शहरात दुपारी जोरदार पाऊस झाला.