देशभर विलगीकरण कक्ष उभारायला रेल्वे सज्ज

देशभर विलगीकरण कक्ष उभारायला रेल्वे सज्ज

कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी आता भारतीय रेल्वेही सज्ज झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संबंधीची माहिती दिली. दिल्लीतील दोन रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या डब्यात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर अर्थात विलगीकरण कक्षाचे फोटो गोयल यांनी शेअर केले. यावेळी देशभर असे विलगीकरण कक्ष उभारण्याची रेल्वेची तयारी असल्याचे गोयल यांनी सांगितले.

रविवार, १८ एप्रिल रोजी गोयल यांनी रेल्वेच्या डब्यात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. यावेळी शाकुर बस्ती स्थानकात ५० डब्यांमधे ८०० बेड्सची सुविधा असणारा कक्ष उभारण्यात आला आहे. तर आनंद विहार स्टेशनमध्ये २५ डबे उपलब्ध असणार आहेत असे पियुष गोयल यांनी सांगितले. तर देशभर तीन लाखांपेक्षा अधिक बेड्सची सुविधा असणारे कक्ष उभारण्याची भारतीय रेल्वेची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यांच्या मागणीनुसार हे कक्ष तयार करण्यात येतील असेही गोयल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

रडत बाजीराव आणि चाय-बिस्कुटी प्रचार

रेमडेसिवीर पुरवठादारांना ठाकरे सरकारचाच त्रास! आधी धमकी, मग पोलीसांनी उचलले

देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

सध्या देशभर कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देश होरपळून निघत आहे. देशात अनेक ठिकाणी रूग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याचे जाणवत आहे. अशावेळी भारतीय रेल्वेच्या डब्यांचे रूपांतरण विलगीकरण कक्षात करता येणे शक्य असते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील देशात अनेक ठिकाणी रेल्वेच्या डब्यांमधे असे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. महाराष्ट्रात सध्या नंदुरबारमध्ये रेल्वेच्या २१ डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये एका डब्यात १६ रुग्णांची सोय करण्यात आली आहे. तर रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुवीधांचीही सोय केली गेली आहे.

Exit mobile version