मुंबईहून कानपूरला जाणाऱ्या विशेष सुपरफास्ट ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून उत्तरेकडे जाणाऱ्या लोकांचा वाढत ओघ लक्षात घेता या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे विभाजन होऊन गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.
०४१५५ सुपरफास्ट स्पेशल गाडी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दिनांक १३ मे २०२१ आणि 16.5.2021 या दोन दिवशी सुटेल. रात्री १२.२५ वाजता ही गाडी मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता कानपूरला पोहोचेल.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमधील हिंसा म्हणजे जिहादी मानसिकता
यश आलं की राज्याचं,अपयश आलं की केंद्राचं
हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री
तर ०४१५६ सुपरफास्ट स्पेशल गाडी कानपुर सेंट्रल वरून ११ मे २०२१ आणि १४ मे को२०२१ रोजी रात्री ७.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११ वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
ही गाडी दादर, कल्याण, नासिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, चित्रकूट, धाम कर्वी, अतर्रा, बांदा, रागौल, भरवा सुमेरपुर, घाटमपुर या स्थानकांवर थांबेल. या गाडीच्या डब्यांची रचना एक एसी २-टियर,, दोन एसी 3-टियर,, १० स्लीपर आणि ९ सेकंड क्लास सीटिंग।
हे गाडी पूर्णतः आरक्षित स्वररूपाची असून १० मे २०२१ पासून www.irctc.co.in या वेबसाईटवर सुरु होईल