…आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासनीसांनी डोळ्यावर बांधल्या पट्ट्या

रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनुभवले दृष्टिहिनांचे जीवन

…आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासनीसांनी डोळ्यावर बांधल्या पट्ट्या

सर्वसामान्यांच्या डोळ्यावर थोड्या वेळासाठी का होईना पट्टी बांधली तर त्याला आपण संपूर्ण पांगळे झाल्याचाच अनुभव येतो. मग, ज्यांच्या आयुष्यात हा अंध:कार कायमसाठी मुक्कामाला आला असेल, तर त्यांचे आयुष्य ते कसे जगत असतील? त्यांना त्यांची दृष्टी परत मिळवण्यासाठी सर्वसामान्य माणूस काही करू शकत नसला तरी अशा दृष्टिहीन व्यक्तींचे दैनंदिन आयुष्य सुखकर करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाऊ शकतात. हीच शिकवण शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि तिकीट तपासनीसांना देण्यात आली.

‘सेंट झेव्हिअर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअल चॅलेंज्ड’ विभागाद्वारे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासाठी शनिवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि तिकीट तपासनीसांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. स्थानक परिसरात आणि गाड्यांमध्ये दिसणाऱ्या दृष्टिहीन प्रवाशांना प्रभावीपणे कशी मदत कराल, हे या कार्यशाळेत शिकवण्यात आले.

मुख्य तिकीट परीक्षक मंजवी राजपूत यांनी त्यांचा या कार्यशाळेतील अनुभव सांगितला. ‘डोळ्यांवर पट्टी बांधून केलेली ही १५ मिनिटांची कसरत म्हणजे आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक काळ होता,’ असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना आजूबाजूचा परिसर दाखवण्यात आला, नंतर डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना त्यांच्या आसनांवर परत येण्यास सांगितले. ‘सर्व काही अंधारलेले होते आणि तुम्हाला तुमच्या इतर इंद्रियांवर अवलंबून – श्रवण, स्पर्श, गंधाद्वारे तिथपर्यंत पोहोचणे, हे या दृष्टिहीन प्रवाशांसाठी किती आव्हानात्मक आहे, याची आम्हाला जाणीव झाली,’ असे त्यांनी सांगितले.

रेल्वे फलाटावर दृष्टिहीन व्यक्तींना मार्ग दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाची मार्गिका आखण्यात आली आहे. या मार्गावरून चालताना ते त्यांच्या काठीचा वापर करतात, त्या द्वारे येणारी कंपनाद्वारे तसेच, येणाऱ्या बीप आवाजाद्वारे त्यांना दृष्टिहिनांसाठी बनवण्यात आलेल्या कोचची जागा कळते. या पिवळ्या रंगाच्या मार्गिकेपासून अंतर राखून चालण्याच्या सूचना प्रवाशांना द्याव्यात, असे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.

‘शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना मदत करणे, हा आमच्या कामाचाच भाग आहे आणि या कार्यक्रमामुळे आम्हाला मदत झाली,’ असे आरपीएफ कॉन्स्टेबल चंद सिंग यांनी सांगितले. ‘दृष्टिहीन लोकांप्रती अधिक संवेदनशील व्हा,’ असे आवाहन झेवियर्स रिसोर्स सेंटरचे प्रशिक्षक केतन कोठारी यांनी केले.

हे ही वाचा:

सांगलीमधील आश्रमशाळेतील १७० मुलांना विषबाधा

“‘मातोश्री’च्या निकटवर्तीयाकडून नितीन देसाईंना धमक्या”

नीरज चोप्रा जगज्जेता

गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन दगावले

जे स्वत: एक दृष्टिहीन व्यक्ती आहेत. ‘एक दृष्टिहीन व्यक्ती दैनंदिन जीवन कसे जगते, याविषयी त्यांना संवेदनशील बनवण्याच्या उद्देशाने सहभागींना हे उपक्रम देण्यात आले होते. मी त्यांना सांगितले की, या लोकांना कठोर वागणूक देऊ नका. अशा प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करावा, अशी आमची अपेक्षा नाही, परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी विनम्रपणे, समजूतदारपणे वागावे, त्यांना मदत करावी, अशी आमची इच्छा आहे. त्यांना सहानुभुतीची गरज नाही, तर या कर्मचाऱ्यांनी सह-अनुभती घ्यावी, हा या कार्यशाळेचा उद्देश होता,’ असे सांगत कोठारी यांनी या कार्यशाळेमागील भूमिका विशद केली.

Exit mobile version