आजकाल वंदे भारत ट्रेन ही प्रवाशांची सर्वात लोकप्रिय आणि आवडती ट्रेन बनली आहे. देशातील अनेक राज्यात वंदे भारत कार्यरत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना रोज समोर येत आहेत. अलीकडे दोन ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी गाड्यांच्या काचेवर दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही, मात्र अशा घटनांमुळे रेल्वे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या पाच वर्षांत दगडफेकीच्या जवळपास अशा ५० घटना घडल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
देशात सध्या १०२ वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत, ज्या १०० मार्गांवर धावतात. वंदे भारत विविध राज्यांतील २८० हून अधिक जिल्ह्यांना जोडण्याचे काम करते. दरम्यान, या गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, रेल्वेने अनेक मार्गांवर ब्लॅक स्पॉट्स शोधले आहेत, जेथे घटना एकापेक्षा जास्त वेळा घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना या ग्रामीण भागात घडल्या आहेत. या दगडफेकीमुळे रेल्वे प्रशासनाला लाखोंचे नुकसान झाले आहे. नुकताच गेल्या वर्षी रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२३ या कालावधीत केवळ दगडफेकीमुळे रेल्वेचे सुमारे ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अशा घटनांमध्ये अजूनही घट झालेली नाही.
हे ही वाचा :
दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’
४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा
३० वर्षांपूर्वी बांधलेल्या मशिदीच्या कमानीवर प्रशासनाचा बुलडोजर !
हिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा…
दगडफेकीमुळे तुटलेल्या ट्रेनच्या काचा दुरुस्त करण्यासाठी दरवर्षी १५ लाख रुपये खर्च केले जातात. आतापर्यंत दगडफेकीमुळे रेल्वेचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये रेल्वेने दीडशेहून अधिक जणांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली आहे.दरम्यान, रेल्वेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान केल्याबद्दल दोषी आढळल्यास, रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १५१ अंतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये पाच वर्षांची शिक्षा आणि दंड किवा दोन्ही तरतुदींचा समावेश आहे.