32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषत्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!

त्या रेल्वे पोलिसांनी चार महिन्यांत ५३ जणांचे जीव वाचवले!

पोलिसांचा सत्कार अतिरिक्त पोलिस महासंचालक (रेल्वे) डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी केला

Google News Follow

Related

१५ जून हा दिवस शॉबई अत्तरगे या रेल्वे पोलिस कधीही विसरणार नाहीत. गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी दहिसर रेल्वे स्थानकावर स्वतःचा जीव धोक्यात घालून एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता. २० वर्षीय अत्तरगे तेव्हा नाईट ड्युटीवर होत्या आणि स्टेशनच्या फलाट क्रमांक दोनवर गस्त घालत असताना पहाटे त्यांना एक महिला दिसली. ती महिला ट्रेनखाली आत्महत्या करत असल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले. त्या फलाट क्रमांक १वरून रुळांवर उतरल्या. दोन रुळांमध्ये कुंपण होते. मात्र त्यांनी क्षणार्धात ते पार केले आणि तिने फोनवर बोलत असलेल्या महिलेला रुळांपासून दूर ढकलले आणि जवळजवळ उचलूनच फलाटावर आणले.त्यानंतर तासभर तिचे समुपदेशन केले.

घाटकोपर येथे गुरुवारी झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात अशा कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या विविध भागांतील ३७ जीआरपी कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. त्यात आपलाही सत्कार झाल्याने अत्तरगे भारावून गेल्या होत्या. या पोलिसांचा सत्कार अतिरिक्त पोलिस महासंचालक (रेल्वे) डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी केला. जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांत ५३ लोकांचे प्राण वाचले. या प्रत्येक प्रवाशाचे प्राण कसे वाचले, हे सीसीटीव्हीने कैद केले होते. कार्यक्रमात त्याची झलक दाखवण्यात आली.

कॉन्सेटबल चेतन तातू यांची कामगिरीही विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी जबर जखमी झालेल्या १२ वर्षांच्या मुलाला रुळांमधून बाहेर काढून कधी चालत तर कधी पळत ३०० मीटरवर असलेल्या वांद्रे स्थानकापर्यंत पोहोचवले होते. फरहान अन्सारी हा मुलगा जानेवारी २०२३ मध्ये मित्रांसोबत प्रवास करताना ट्रेनमधून पडला होता आणि त्याचा डावा पाय त्याच्या मांडीला लटकला होता. ‘मै बचुंगा क्या, सर’, असे त्याने तातूला विचारले होते. ‘मी शपथ घेतली होती की, त्याला वाचवण्यासाठी मी मला जितकं शक्य होईल, ते सर्वकाही करेन,’, असे तातू म्हणाले. तातूने अवघ्या १० मिनिटांत मुलाला वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. अन्सारीचा पाय कापावा लागला, परंतु त्याचा जीव वाचला.

हे ही वाचा:

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत महिन्याभरात १६३ मुले पुन्हा कुटुंबीयांकडे परतली!

७५ वर्षांत प्रथमच एसटीचे सारथ्य महिलेकडे

निर्मला सितारामन यांच्या मुलीचा अत्यंत साधेपणाने विवाह

सकाळी ९ चा भोंगा बंद करा अन्यथा… संजय राऊतांना धमकी   

सरवदे यांनी कार्यक्रमादरम्यान प्रत्येक पोलिसाचे कौतुक केले. ‘प्रत्येक पोलिसाने दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी सहजतेने कृती केली होती. कारण कोणतीही योजना आखण्यास वेळ नव्हता,’ असे सरवदे म्हणाले. औरंगाबाद येथेही रेल्वेचे साहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप राणे यांना वॉश बेसिनच्या खाली एक नवजात अर्भक सापडले होते. ज्याची नाळ नुकतीच तोडलेली होती. छोट्याशा जागेत हे बाळ अडकले होते. मात्र डॉक्टरांना बोलावण्यापूर्वीच त्यांनी त्याची सुटका केली.   प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांचा गौरव करण्याबरोबरच प्रवाशांची सेवा करणाऱ्या पोलिस ठाण्यांना सरवदे यांनी गौरवले.

या वर्षाच्या सुरुवातीला केआरएसारखे मूल्यांकन जाहीर करण्यात आले होते. ज्या अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्याला सहा श्रेणींमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारे गुण प्राप्त करायचे होते. त्यामध्ये दोन तासांच्या आत वेगाने एफआयआर नोंदवणे, अपहरण प्रकरणांमध्ये एसओपीचे पालन करणे, महिलांवरील गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना त्वरित पकडणे, इतरांसह हरवलेल्या अल्पवयीन मुलांची सुटका करणे आदी बाबींचा समावेश होता. वडाळा जीआरपी ठाण्याने दोन तासांच्या आत जास्तीत जास्त एफआयआर नोंदवल्याबद्दल पुरस्कार जिंकला तर कल्याण जीआरपी ठाण्याला एका महिलेविरोधात गुन्हा करणाऱ्याला रंगेहाथ पकडल्याबद्दल पुरस्कार मिळाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा