दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई

रेल्वे प्रशासनाने पाठवली नोटीस

दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई

दिल्लीतील बंगाली मार्केट मशीद आणि तकिया बब्बर शाह यांना उत्तर रेल्वे प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. नोटीस मध्ये लिहिले आहे की, रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण झाले आहे. रेल्वेच्या जमिनीवर बांधलेली अनधिकृत इमारत/मंदिर/मशीद/मझार या नोटीसच्या १५ दिवसांच्या आत तुम्ही स्वेच्छेने हटवा, अन्यथा रेल्वे प्रशासन कारवाई करेल असे या नोटीसमध्ये लिहिले आहे.

दिल्लीत अनेक मशिदी आहेत. त्यातील दोन मोठ्या मशिदींना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यातील, बंगाली मार्केट आणि आयटीओमध्ये असलेल्या तकिया बब्बर शाह या मशिदींना रेल्वेने नोटीस दिली आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये रेल्वेने दोन्ही मशिदींच्या प्रशासनाला १५ दिवसांत अतिक्रमण हटवण्यास सांगितले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. रेल्वेने जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते- १५ दिवसांत अतिक्रमण काढा, अन्यथा आम्ही येऊन हटवू. दुसरीकडे शेकडो वर्षे जुनी असल्याचे मशीद समितीचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार

मात्र, रेल्वे त्यांच्या जमिनीवर बांधल्याचे सांगत आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. त्यात लिहिले आहे- रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण झाले आहे. रेल्वेच्या जमिनीवर बांधलेली अनधिकृत इमारत/मंदिर/मशीद/मझार ही नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत तुम्ही स्वेच्छेने हटवा, अन्यथा रेल्वे प्रशासन कारवाई करेल. रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत अतिक्रमण काढले जाईल. प्रक्रियेत झालेल्या कोणत्याही हानीसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल.

रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे नोटीस मध्ये नमूद केले आहे. मशीद तकिया बब्बर शाहचे सचिव अब्दुल गफ्फार यांच्या मते, ही मशीद सुमारे ४०० वर्षे जुनी आहे. या मशिदीच्या शेजारी बांधलेले एमसीडीचे मलेरिया कार्यालय रिकामे करण्याची नोटीसही रेल्वेने दिली आहे.

Exit mobile version