केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य

केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य

देशाचे नाव लवकरच भारत होण्याचे संकेत मिळत आहेत. रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय मंत्रिमंडळाकडे त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजात ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे नाव देण्याचा पर्याय सुचवला आहे. अशा प्रकारे ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’हे नाव सर्व ठिकाणी म्हणजे मालवाहतूक वगैरेशी संबंधित सर्व प्रकारच्या कामकाजात वापरले जाणार आहे. मंत्रिमंडळाकडे आलेला हा कदाचित पहिलाच प्रस्ताव असल्याचे मानले जात आहे. येत्या काळात अन्य सरकारी कागदपत्रांमध्येही ‘भारत’ या नावाचा वापर वाढवला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

 

भारताच्या राज्यघटनेत ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या दोन्ही संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे आणि कॅबिनेटच्या प्रस्तावात याचा वापर करणे, यात काहीही गैर नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. जी २० परिषदेच्या बैठकीत इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा वापर केल्याबद्दल गरादोळ माजला होता. जी २०च्या भोजन समारंभाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आमंत्रण दिले होते. त्यावेळी या आमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडन्ट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले होते.

हे ही वाचा:

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला

‘आमचा संताप गाझाला आता कळेल’

मिटकरींचे ब्राम्हणाला घालीन लोटांगण

१,६०० कोटी रुपयांची फसवणूक; अशोका विद्यापीठाचे संस्थापक ईडीच्या निशाण्यावर!

 

तसेच, जी २० लीडर्स परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच्या नामफलकावरही ‘भारत’ असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांत अनेक सरकारी कार्यालयांतर्फे काढल्या जाणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांमध्येही आवर्जून ‘भारत’ असा नामोल्लेख आढळून येत आहे.

Exit mobile version