आता रेल्वे प्रवास होणार मनोरंजक

आता रेल्वे प्रवास होणार मनोरंजक

रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे. या सुविधेनुसार प्रवाशांना रेल्वेत प्रिलोडेड मिल्टीलिंग्वल कंटेट (विविध भाषांमधील मनोरंजनाचे कार्यक्रम) उपल्बध करुन दिला जाईल. त्यात चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असणार आहे.

रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितले की, “बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवला जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणाऱ्या बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.”

हे ही वाचा:

रेल्वे होणार प्रदुषण मुक्त

रेल्वे ही सुविधा ५ हजार ७२३ उपनगरी रेल्वे आणि ५ हजार ९५२ वाय-फाय असणाऱ्या रेल्वे स्थानकांसह ८ हजार ७३१ रेल्वे गाड्यांमध्ये चालू करणार आहे. एक राजधानी एक्सप्रेस आणि एका पश्चिम रेल्वेतील एसी उपनगरीय रेकमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात आणि परीक्षणाच्या तयारीत आहे.

रेल-टेलने रेल्वे आणि रेल्वे स्थानकावर कन्टेन्ट व डिमांड सुविधा प्रदान करण्यासाठी झी एन्टरटेन्मेंटची सहाय्यक कंपनी मार्गो नेटवर्क्ससोबत भागिदारी केली आहे. ही योजना दोन वर्षात कार्यान्वित केली जाणार आहे. यातील कंटेन्ट पेड आणि अनपेड फॉरमॅटमध्ये १० वर्षांसाठी करार करण्यात आला आहे.

Exit mobile version