भाजपा नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्याउपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज अर्ज दाखल केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज (८ डिसेंबर ) दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानुसार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. परंतु, यावेळेत राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु असून अधिवेशनात नवनिर्वाचित २८८ आमदारांना सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यानंतर उद्या ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. यासाठी राहुल नार्वेकर यांनी आज १२ वाजायच्या आत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राहुल नार्वेकरांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असून उद्या तशी अधिकृत घोषणा होणार आहे.
हे ही वाचा :
संभल हिंसाचार: पत्रकार असण्याचा खोटा दावा करणाऱ्या असीम रझा झैदीला अटक
सीमाभागाचा प्रश्न सुटता कामा नये ही काँग्रेसची भूमिका!
मविआच्या नेत्यांना निवडणुकीपुरते संविधानाची आठवण, शपथविधी सोहळ्यात सिद्ध केले!