25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषकेजरीवालांची चमकती दिल्ली पहा, 'पॅरिस सारखी दिल्ली'

केजरीवालांची चमकती दिल्ली पहा, ‘पॅरिस सारखी दिल्ली’

राहुल गांधींकडून व्हिडीओ ट्वीट करत टीका 

Google News Follow

Related

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला आणि दिल्लीचे पॅरिस बनवण्याच्या त्यांच्या आश्वासनाचा समाचार घेतला. सोशल मिडीयावर राहुल गांधींनी दिल्लीतील स्वच्छतेची स्थिती दाखवणारा व्हिडिओ शेअर करत केजरीवालांवर टीका केली. राहुल गांधी एका अस्वच्छ नाला दाखवत म्हणाले, ‘बघा, ही दिल्ली आहे.’ अरविंद केजरीवाल यांची ‘चमकणारी दिल्ली.’

लोकसभेत इंडी आघाडीचा भाग असणाऱ्या आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकला चलोचा नारा दिला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी केली जात आहे. राहुल गांधी देखील विरोधकांना बोलण्याची संधी सोडत नाहीयेत. याआधी सीलमपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीत राहुल गांधीनी केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर आज व्हिडीओ ट्वीटकरत केजरीवाल यांना धारेवर धरत प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिल्लीच्या एका भागाची पाहणी करताना राहिला गांधींना एक अस्वच्छ नाला दिसून आला, ज्याठिकाणी साचलेला कचरा, रस्त्याचे तोडकाम केल्याचे दिसून आले. यावर ते म्हणाले, “दिल्ली पहा. चमकणारी दिल्ली. पॅरिसची दिल्ली. सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे.”

२०१९ मध्ये केजरीवाल यांनी दिल्लीला पॅरिस आणि लंडनप्रमाणे स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले आणि सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत रस्ते, रुग्णालये आणि स्वच्छ यमुना यासह चांगल्या पायाभूत सुविधा असतील. हाच मुद्दा राहुल गांधींनी पकडत अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला.

हे ही वाचा : 

बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना सायकल वाटप

खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

मौलवीच्या त्रासाला कंटाळून मुस्लिम पिता-पुत्राने स्वीकारला ‘हिंदू धर्म’

पीओकेशिवाय जम्मू- काश्मीर अपूर्ण

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा