राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा ब्रेक के बाद

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा ब्रेक के बाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पाच दिवस थांबवण्यात येणार आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेला २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान विश्रांती असणार आहे.

राहुल गांधी दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत. जयराम रमेश म्हणाले की, या सभांमध्ये राहुल गांधी यांची उपस्थिती आवश्यक आहे. याशिवाय राहुल गांधी २७ आणि २८ फेब्रुवारीला इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात जाणार आहेत. राहुल गांधी यांची येथे दोन व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर ते भारतात परततील आणि २ मार्चपासून पुन्हा यात्रेला सुरुवात करतील. राहुल गांधीयांच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सपा नेते सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत लिहिले की, ‘एवढा महत्त्वाचा परदेश प्रवास समजण्यापलीकडचा आहे.’

हेही वाचा :

प्रख्यात कायदेतज्ज्ञ, पद्मविभूषण फली एस नरिमन यांचे निधन

भारतीय संघावर सुनील गावस्कर यांची टीका

शिंदे हसले जरांगे रुसले…

बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!

सध्या राहुल गांधी यांचा दौरा उत्तर प्रदेशात आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा ३९ वा दिवस आहे. त्यांच्या यूपी दौऱ्याचा आज सहावा दिवस आहे. भारत जोडो न्याय यात्रा आज लखनौच्या बंथरा येथून उन्नावमध्ये प्रवेश करेल. राहुल येथे दीड तासात सुमारे १३ किलोमीटरचा रोड शो करणार आहेत. त्यानंतर ते यूपीतील कानपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. आदल्या दिवशी ते रायबरेलीत होते, तिथे त्यांना काळे झेंडे दाखवले होते.

Exit mobile version