माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावरील हमालांची भेट घेतली.तेथे त्यांनी हमालांचा लाल गणवेश परिधान करून डोक्यावर सामान देखील उचलले.मागील काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये रेल्वे स्थानकावरील कुली मित्रांना भेटण्याची इच्छा राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहोचून हमालांची भेट घेतली.हमालांच्या समस्या जाणून घेत बराच काळ त्यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.राहुल गांधींनी हमालांचा लाल गणवेश परिधान केला.एका हमालाच्या मदतीने त्यांनी आपल्या हाताच्या दंडावर ७५६ नंबरचा बिल्ली देखील लावला.तसेच राहुल गांधींनी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांचं सामान देखील डोक्यावर उचललं आहे.
काही हमाल म्हणाले आम्ही अनेक दिवसांपासून राहुल गांधी याना भेटण्याची वाट बघत होतो.आमच्या हमालांच्या काही समस्या त्यांच्यापुढे मांडायच्या असल्याने आम्ही सतत भेटण्याचा आग्रह करत केल्याने काही महिन्यानंतर राहुल गांधी यांची भेट झाली.
हे ही वाचा:
हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !
अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या
मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !
लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हमालांनी आपला आनंद व्यक्त करताना म्हटलं की, “राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, ते आम्हा हमालांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील.”
भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून राहुल गांधी देशातील विविध समाज घटकांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.गेल्या महिन्यात काँग्रेस नेत्याने लेह-लडाखला भेट दिली आणि स्थानिकांशी संवाद साधला.
मे महिन्यात ट्रक ड्रायव्हर्सच्या समस्या तसेच प्रवास करताना भेडसावणारी आव्हाने समजून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी ट्रकने दिल्ली ते चंदीगडला प्रवास केला होता.