नुकतेच पार पडलेल्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांच्यावर अजुणही टीका होत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर कर्नाटकच्या आमदारांनी टीका करत खळबळ जनक विधान केले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना संसदेच्या सभागृहात थप्पड लगावली पाहिजे.
बिजनेस टुडे वृत्तानुसार, राहुल गांधींच्या विधानावर भाजप आमदार भरत शेट्टी म्हणाले की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेच्या सभागृहात थप्पड मारली पाहिजे. असे केल्याने सात ते आठ एफआयआर नोंदवले जातील. जर विरोधी नेते राहुल गांधी मंगळुरू शहरात येणार असतील तर आम्ही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू, असे शेट्टी म्हणाले.
हे ही वाचा:
तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!
राहुल गांधी तुम्ही हिंदू धर्म मानता की नाही?
हाथरसची घटना घडली तेव्हा भोले बाबाचे सेवक पळून गेले!
हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित
ते पुढे म्हणाले, राहुल गांधी वेडे आहेत, भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला तर ते भस्म होऊन जातील. हिंदु धर्म आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे कर्तव्य असल्याचे भरत शेट्टी म्हणाले. काँग्रेसने हिंदू आणि हिंदुत्व वेगळे असल्याचा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. अशा नेत्यांमुळे हिंदू भविष्यात संकटात सापडतील, असे शेट्टी म्हणाले.