राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!

आरोपींवर कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी

राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!

काँग्रेस नेते राहुल गांधी आज (२३ डिसेंबर ) परभणी दौऱ्यावर होते. राहुल गांधीनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांशी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कुटुंबाची भेट झाल्यानंतर राहुल गांधीनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पोलिसांनी सोमनाथ याची हत्या केल्याचा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधींच्या भेटीनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट समोर आले. ज्यामध्ये त्यांनी गिधाडे कायम मृतदेहांचा शोध घेत असतात असे म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मारहाण झालेल्या लोकांचीही भेट घेतली. त्यांनी मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट, व्हिडीओ आणि फोटो दाखवले यामधून कोठडीत मृत्यू झाला हे ९९ टक्के नाहीतर १०० टक्के स्पष्ट होतंय. पोलिसांनी सोमनाथ यांची हत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात पोलिसांना संदेश देण्यासाठी खोटे बोलले आहेत.

हे ही वाचा : 

पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली

अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून आप सरकारच्या विरोधात ‘आरोप पत्र’ जारी

घराचे नाव ‘रामायण’ अन घरच्या लक्ष्मीला कोणीतरी पळवून नेईल!

ते पुढे म्हणाले, दलित असल्या कारणाने युवकाची हत्या करण्यात आली. तो संविधानाचे संरक्षण करत होता. आरएसएसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची विचारधारा आहे. हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यात यावे आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. याठिकाणी आलो हे राजकारण नाहीये, हत्या झाली आहे. हे न्यायाचे प्रकरण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

याच दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले. भातखळकरांनी नाव न घेत राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचे दिसतंय. ते म्हणाले, गिधाडे कायम मृतदेहांचा शोध घेत असतात. त्यांना केवळ पोट भरायचे असते. राजकीय गिधाडांना मात्र दुकान चालवायचे असते.

Exit mobile version