अमेरिकेत लाचखोरीच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राहुल गांधी म्हणाले की, अदानी हे २ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतले आहेत. पंतप्रधान मोदींकडून त्यांना संरक्षण मिळत असल्यामुळेच त्यांना कसली काळजी नाही. अदानी यांनी भारतीय आणि अमेरिकन कायदा मोडला आहे. मला आश्चर्य वाटते की अदानी या देशात एक मुक्त माणूस म्हणून का वावरत आहे, असा सवाल त्यांनी केला. अदानी आणि पंतप्रधान मोदी हे सुद्धा अदानी यांच्या सोबत भ्रष्टाचारात गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
यूएसच्या वकिलांनी अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर २,०२९ कोटी रुपये (राज्य वीज वितरण कंपन्यांसोबत सौर ऊर्जा करार करण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याबद्दल) आरोप लावल्यानंतर राहुल गांधी यांनी हा हल्ला केला आहे. हा प्रकार २०२० आणि २०२४ च्या दरम्यान घडला आहे.
हेही वाचा..
महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!
अमेरिकेत आश्रयासाठी अनमोल बिश्नोईचा अर्ज!
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची घसरण
बांगलादेशातील युनूस सरकारचा पर्दाफाश; अल्पसंख्य हिंदूंचा हिंसाचारात बळी गेल्याचे स्पष्ट!
राहुल गांधी यांनी संकेत दिले की, ते संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करतील आणि अदानी समूहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समिती चौकशी करण्याच्या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. विरोधी पक्षनेता म्हणून ही मागणी करणे ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भारताची संपत्ती मिळवली आहे. आणि ते भाजपला पाठिंबा देतात.
गांधी म्हणाले, कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी तपासात सर्व राज्यांचा समावेश असावा. आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तामिळनाडू आणि जम्मू आणि काश्मीर या चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्यात आल्याचा अमेरिकेच्या आरोपात उल्लेख आहे.