राहुल गांधी म्हणतात, ५२ वर्षांचा झालो पण आजही मला घर नाही!

अधिवेशनात सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न

राहुल गांधी म्हणतात, ५२ वर्षांचा झालो पण आजही मला घर नाही!

आपल्या अजब विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आता आणखी एका वक्तव्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनात ते म्हणाले की, मी ५२ वर्षांचा झालो आहे पण अजूनही माझे स्वतःचे घर नाही.

राहुल गांधी यांनी या भाषणात भारत जोडो यात्रेपासून अनेक राजकीय घडामोडींबद्दल भाष्य केले.

त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ५२ वर्षांचा झालो पण माझ्याकडे घर नाही. माझ्या कुटुंबाकडे घर आहे ते अलाहाबादला आहे. १२० तुघलक लेनमधील घर हे माझे नाही. जेव्हा पदयात्रेला निघालो तेव्हा माझ्या अवतीभवती लोक होते. अनेक लोक मला भेटायला येत होते. पुढील चार महिने हेच लोक म्हणजे हे घर माझ्यासोबत चालणार आहे याची खूणगाठ बांधली होती. सगळ्या धर्माचे, श्रीमंत गरीब अशा प्रत्येकाला हे घर आपलेच वाटायला हवे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली लतादिदींची आठवण, रांगोळी, अंगाई गीत कलेची घेतली दखल

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उभारले होते क्रांतिचे मंदिर; अभिनव भारत मंदिर

सीमेंट, फायबर विटांखालून आणली जात होती दारू

उद्धव-केजरीवाल भेट; एकमेकांची पाठ खाजविण्याचे ‘मॉडेल’

राहुल गांधी यांनी १९७७चा एक किस्सा सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, तेव्हा घरात विचित्र वातावरण होते. मी आईला विचारले काय झाले? तेव्हा ती म्हणाली की, आम्हाला घर सोडावे लागणार आहे. तोपर्यंत मला वाटत होते की, हे माझेच घर आहे. तेव्हा आई म्हणाली की, हे आपले घर नाही. सरकारी घर आहे. आता आपल्याला इथून जायचे आहे. मी विचारले की, कुठे जायचे आहे? ती म्हणाली की, मला माहीत नाही कुठे जायचे आहे? तेव्हापासून आज मी ५२ वर्षे झाली. आज मी ५२ वर्षांचा आहे पण माझ्याकडे घर नाही.

Exit mobile version