काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतःची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यानुसार, त्यांची स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, बँकेच्या ठेवी यांसह २० कोटींची मालमत्ता आहे. यात स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे. त्यांच्यावर ४९ लाख ७० हजारांचे कर्जही आहे.
काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे स्टॉक मार्केटमध्ये चार कोटी ३० लाखांची गुंतवणूक असून म्युच्युअल फंडमध्ये तीन कोटी ८१ लाख आहेत. तर, बँकेत २६ लाख २५ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच, त्यांच्याकडे ५५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. अशा प्रकारे त्यांचे सन २०२२-२३ मधील संपूर्ण उत्पन्न एक कोटी दोन लाख ७८ हजार ६८० रुपये आहे. राहुल गांधी यांच्याकडे १५ लाख २० हजार रुपयांचे गोल्ड बाँड्स आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय बचत योजना, पोस्ट आणि विमा अशा ६१ लाख ५२ हजार रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे चार लाख दोन हजारांचे दागिने आहेत.
हे ही वाचा:
आयएएस पदाचा परमपाल कौर सिद्धू यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!
सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!
मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा
३६ टक्के आयआयटी मुंबईचे पदवीधर नोकऱ्या मिळवण्यात अपयशी!
राहुल गांधी यांच्याकडे नऊ कोटी २४ लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ११ कोटी १४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या एकूण मालमत्तांची किंमत २० कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांच्यावर ४९ लाख ७० हजारांचे कर्जही आहे.
राहुल गांधी यांनी मोठा रोड शो करून वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासमोर माकपचे ऍनी राजा आणि भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन लढत देणार आहेत. सन २०१९मध्ये तब्बल चार लाखांच्या मताधिक्याने राहुल गांधी निवडून आले होते. येथे २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.