राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी ‘पात्र’ नाहीत!

मंदिर ट्रस्टीकडून राजकीय पाहुण्यांसाठी तीन श्रेणी तयार

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी ‘पात्र’ नाहीत!

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याला गांधी परिवारातील केवळ सोनिया गांधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने उद्घाटन सोहळ्यासाठी काही निकष तयार केले आहेत. त्यात निकषांमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी हे पात्र ठरत नसल्याने त्यांना या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या अधिकारात काँग्रेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवले आहे. ट्रस्टने राजकीय पाहुण्यांसाठी तीन श्रेणी तयार केल्या आहेत. त्यानुसार आमंत्रण पाठवले आहे. मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांचे अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि ज्यांनी १९८४ ते १९९२ या कालावधीत राम मंदिर चळवळीत सहभाग घेतला होता, असे कार्यकर्ते यांना या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवले जाणार आहे. तसेच, साधूसंत, उद्योजक, कलाकार आणि खेळाडूंचेही स्वागत केले जाणार आहे.

हे ही वाचा:

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार

बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांनी नुकतेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण पाठवले आहे. खर्गे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही आहेत. अर्थात सन २०१४पासून लोकसभेत विरोधी पक्षनेते हे पदच अस्तित्वात नसल्याने विहिंपतर्फे काँग्रेसचे संसदेतील नेते अधीर रंजन चौधरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपच्या प्रमुख मायावती यांनाही लवकरच निमंत्रण पाठवले जाणार आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ‘प्रभू राम हे सर्वांसाठी आहेत. सोहळ्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. या सोहळ्याला राजकीय रंग चढू नयेत, याची काळजी घेण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे विहिंपचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी सांगितले.

Exit mobile version