28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषवॉशिंग्टनमध्ये राहुल गांधींभोवती भारतविरोधकांची मांदियाळी

वॉशिंग्टनमध्ये राहुल गांधींभोवती भारतविरोधकांची मांदियाळी

भारतीय लोकशाहीबद्दल व्यक्त केली शंका

Google News Follow

Related

वॉशिंग्टन डीसी येथील येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची मुलाखत झाली. त्यात राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे भारतविरोधी गरळ ओकली. आपल्या पदयात्रेचा प्रचार करण्याच्या हताश प्रयत्नात राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे.  या भेटीत राहुल गांधी यांनी अनेक भारतविरोधी व्यक्तींशी चर्चा केली.

सोशल मीडियावर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये राहुल गांधी भारतविरोधी, बांगलादेशी ‘पत्रकार’ मुशफिकुल फजल अन्सारे यांच्याशी संवाद साधताना दिसत होते. या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांच्या पत्रकार परिषदेत दिल्ली मद्य धोरण प्रकरणात (जी भारताची अंतर्गत बाब आहे) AAP नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा केल्यावर अन्सारे हे प्रकाशझोतात आले. राहुल यांच्यासोबत इल्हान ओमर या अमेरिकन संसद सदस्याही दिसतात. ज्या भारतविरोधी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी भारतविरोधात अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रस्ताव ठेवलेला आहे. ३७० कलम हटविण्याविरोधात त्यांनी आवाज उठवलेला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या मदतीच्या जोरावर प्रवेश केला तसेच भारतात इस्लामला धोका आहे, यासाठी त्यांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतलेली आहे.

मुशफिकुल फजल अन्सारे यांनी हाच मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांच्या प्रवक्त्यासमोर मांडला. Just News BD वर एक अहवाल आहे, त्यात बांगलादेश सरकारने डिजिटल सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्सारेवर खटला भरल्याचा उल्लेख केला होता. नोव्हेंबर २०२२ च्या अहवालानुसार ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस (DMP) च्या काउंटर टेररिझम अँड ट्रान्सनॅशनल क्राइम (CTTC) विभागाने मुशफिकुलवर गुन्हा दाखल केला होता आणि मुशफिकुलला या प्रकरणात ‘फरार’ होता.

याच अहवालात नमूद केले आहे की, मुशफिकुल बांगलादेशी सरकारने २०१५ मध्ये बंदी घातलेले वेबपोर्टल चालवत असे. त्याच्यावर अनेक प्रसंगी सरकारबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे. मुशफिकुल हा बांगलादेश समर्थक पक्ष (BNP) आहे, जो भारताच्या ईशान्येकडील बंडखोरीला पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो. यूएनमधील बांगलादेशच्या मिशनने त्याच्या “सक्रिय” राजकीय भूमिका आणि संलग्नता असूनही “पत्रकार” म्हणून विविध कार्यक्रमांमध्ये त्याच्या सहभागावर आक्षेप घेतला होता.

 

हेही वाचा..

काँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !

‘वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, ट्रेनच्या खिडकीच्या काचा फुटल्या’

राहुल गांधींच्या वक्तव्याने काँग्रेसचा चेहरा उघड !

खलिस्तानी नेता गुरुपतवंत पन्नू राहुल गांधींच्या पाठीशी !

सोमोय न्यूजने म्हटले होते की, मुशफिकने जमात या संघटनेचा प्रचार सोशल मीडियावर केला होता. वॉशिंग्टन स्थित हिंदूऍक्शन या गटाने म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी तिथे सरिता पांडे यांचीही भेट घेतली. याच सरिता पांडे यांनी गेल्या वर्षी वॉशिंग्टनला भेट घेऊन सोनिया गांधी यांचे पोट्रेट राहुल गांधींना भेट दिले होते.

या सरिता पांडे इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिलचे सल्लागार संचालक अजित साही यांच्या पत्नी आहेत. या संघटनेची स्टुडन्ट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी) या संघटनेशी संबंध आहेत. शिवाय, लष्कर ए तैयबा आणि जमाते इस्लामी या संघटनांशी त्यांची नाळ जुळलेली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा