राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले

राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले

प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमास अदानी, अंबानी यांना बोलावण्यात आले होते, मात्र साधे, गरीब, मजूर अशांना आमंत्रित केले नाही असा खोटा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये केला आहे. विशेष म्हणजे राम मंदिरात प्रभू रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेला छत्तीसगडमधील ८५ वर्षांच्या रॅगपिकर बिदुला बाई आणि आरोग्य सेविका संतोष देवी यांना आमंत्रित केले होते याचा विसर राहुल गांधी यांना पडला असल्याचे दिसून येते.

जसजशी सार्वत्रिक निवडणूक जवळ येत आहे तसतसे राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या प्रशासनाविषयी खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी सांगत आहेत की, मोदी सरकारने अंबानी आणि अदानी सारख्या उच्च-प्रोफाइल उद्योगपतींना तसेच ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन सारख्या सेलिब्रिटींना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास आमंत्रित केले आहे.

परंतु समारंभासाठी देशातील गरीब आणि बेरोजगार नागरिकांना आमंत्रित केले नाही. गांधी यांनी दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्तीसगडमधून त्यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू केली आहे. ते म्हणाले, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी, मी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अदानी, अंबानी आणि सर्व उद्योगपतींना या कार्यक्रमाला हजेरी लावताना पाहिलं पण त्यांच्यापैकी एकही गरीब, शेतकरी, मजूर, बेरोजगार किंवा ‘चाय वाला’ मला दिसला नाही.

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या प्रशासनावर टीका करणे हि त्यांची जुनी सवय आहे. असे विधान करण्यापूर्वी त्यांनी थोडा अभ्यास केला असता तर त्यांना माहिती झाले असते कि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व स्तरातील लोकांना आमंत्रित केले होते. एका बाजूला अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते, तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अनेक कारसेवक, साधू, मजूर, स्वच्छता कर्मचारी इत्यादींच्या कुटुंबीयांसह विनम्र पार्श्वभूमीतील अनेक लोकांना आमंत्रित केले होते.

Exit mobile version