ओवैसी आणि राहुल गांधी यांच्यात जुंपली!

राहुल गांधींचे दोन यार एक इटली आणि दुसरे नरेंद्र मोदी, असुद्दीन ओवैसींचा राहुल गांधींवर पलटवार

ओवैसी आणि राहुल गांधी यांच्यात जुंपली!

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.तेलंगणा राज्यात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चाललेल्या युद्धात भाजपने देखील विजयाचा दावा केला आहे.या युद्धात एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी आणि राहुल गांधी यांच्यात खालच्या पातळीच्या टिप्पणी पाहायला मिळाल्या.तेलंगणामध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी केसीआर, भाजप आणि ओवैसी याना लक्ष केलं होत.राहुल गांधी म्हणाले होते की, मोदींचे तीन यार (मित्र) आहेत,ओवैसी आणि केसीआर.राहुल गांधींच्या या टिप्पणीला असुद्दीन ओवैसी यांनी उत्तर देत म्हटले की, राहुल गांधींचे दोन प्रेम आहेत, इटली आणि दुसरे नरेंद्र मोदी.

असुद्दीन ओवैसी म्हणाले की, राहुल गांधी यांचे इटलीवर प्रेम आहे कारण, त्यांची आई इटलीची रहिवासी आहे.दुसरीकडे मोदी यांच्यावर प्रेम आहे कारण, मोदींकडूनच राहुल गांधी याना ताकद मिळते.ओवैसी म्हणाले की, अमेठीची जनता राहुल गांधीची दोस्त का नाही बनली? असा सवालही त्यांनी केला.त्यांनी स्मृती इराणी याना निवडले.

हे ही वाचा:

आयपीएलच्या कोलकाता संघातून शार्दुल ठाकूर बाहेर!

दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!

मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!

दगडफेकीच्या घटनेबाबत नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा!

असुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी आता आजून सिंगल राहणे टाळले पाहिजे.कारण राहुल गांधी ५० वर्षांचे झाले आहेत.

ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या घरी त्यांचा कोणी सोबती नाही आहे. त्यामुळे ते बाहेरच्या यारांचे(मित्रांचे) विचार करत असतात.राहुल गांधी यांनी आता अशा गोष्टी बोलू नयेत.त्यांची योग्य वेळ आता निघून गेली आहे.या अगोदर राहुल गांधी म्हणाले होते की, केसीआर आणि ओवैसी हे मिळालेले आहेत आणि हे दोघे पंतप्रधान मोदींचे आतील दोस्त आहेत.

 

 

Exit mobile version