भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप झाल्याच्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप विरोधक करत आहेत, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आल्याचे भाजपाकडून म्हटले जात आहे. या प्रकरणी तपासणी पथकाकडून तपास सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उडी घेत पंतप्रधान मोदींना लक्ष करत प्रश्न उपस्थित केला. मात्र, राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे यांनी चोख उत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी पालघरमधील हॉटेलचा व्हिडीओ शेअरकरत पंतप्रधान मोदींना प्रश्न केला की, ‘मोदीजी, हे ५ कोटी कोणाच्या तिजोरीतून आले आहेत. जनतेचा पैसा लुटून तो टेम्पोतून तुम्हाला कोणी पाठवला?, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
हे ही वाचा :
पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न!
अणुऊर्जा समर्थीत देशाने रशियावर आक्रमण केला तर अण्वस्त्र हल्ला
वरळीतील लोकं ठाकरेंचे पैसे घेतील पण मतं देणार नाहीत
काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!
यावर विनोद तावडे यांनी उत्तर देत म्हटले, राहुल गांधी जी, तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, येथे निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचा आढावा घ्या आणि मग सिद्ध करा की, इथे तुम्ही म्हणताय तशा प्रकारे पैसे आलेत. कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेता अशा प्रकारचे विधान करणे हा पोरकटपणा नाहीतर दुसरं काय?, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
. @RahulGandhi जी, आप स्वयं नालासोपारा आएँ, होटल का सीसीटीवी फुटेज देखें, वहाँ हुई निर्वाचन आयोग की पूरी कार्यवाही देखें और यह साबित करें कि इस प्रकार पैसा आया।
बिना किसी जानकारी के इस प्रकार का वक्तव्य बचपना नहीं तो और क्या है! https://t.co/KOgj6vQqJY
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 19, 2024