पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ‘पनवती’ (अपशकून) आणि ‘पाकीटमार’ (पिक पॉकेट) अशी अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.राहुल गांधी यांना २५ नोव्हेंबर शनिवारी संद्याकाळी ६ वाजेपर्यंत नोटीशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे.
राजस्थानमधील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टिप्पणी केली होती. पंतप्रधान मोदी म्हणजे पनौती आहेत, भारतीय टीम चांगलं खेळत होती, पण हे पनवती तिकडे गेले आणि आपली टीम हरली, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावरून राहुल गांधी यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती.
राहुल गांधींच्या या टीकेला भाजपकडून देखील उत्तर देण्यात आलं होतं.या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच एफआयआर दाखल करण्याची मागणी देखील वकील विनित जिंदल यांनी केली होती.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!
ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
निवडणूक आयोगाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधानांची तुलना पाकीटमार सोबत करणे आणि पनवती शब्द वापरणे हे राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला अशोभनीय आहे.
दरम्यान, राहुल गांधी याना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून पाठ्वण्यात आलेल्या नोटिशीला राहुल गांधी याना शनिवार पर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.