राहुल गांधीना एमआरपी आणि एमएसपी मधील फरक कळेना !

राहुल गांधीना एमआरपी आणि एमएसपी मधील फरक कळेना !

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये बोलताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ची बरोबरी कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) बरोबर केली आहे. एमएसपी कायदेशीर करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठींबा देत गांधी यांनी अशा पद्धतीचा युक्तिवाद केला आहे. एवढेच नाही तर दुकानदार त्यांच्या वस्तू म्हणजे कॅमेरा,चिप्स आणि पाण्याच्या बाटल्या वर लिहिलेल्या एमआरपी पेक्षा कमी किंमतीत विकू शकत नाही.

कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्युब हँडलद्वारे अपलोड केलेल्या या दोन व्हिडिओंमध्ये एमआरपी आणि एमएसपी यांची बरोबरी करणारा विशिष्ट संदर्भ असलेला व्हिडीओ ऐकता येईल. तथापि, एमएसपी आणि एमआरपी या दोन भिन्न आणि विरोधाभासी मर्यादा आहेत आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्याच्या विरोधात किरकोळ विक्रेते/दुकानदारांना अनेक वस्तूंवर सेट केलेल्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा कमी विक्री करण्यास कायदेशीररीत्या किंवा अन्यथा प्रतिबंधित नाही. खरे तर सामान्य बाजार पद्धतीने जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी किरकोळ विक्रेते सवलत देतात आणि एमआरपी दरापेक्षा कमी वस्तूंची विक्री करतात.

हेही वाचा..

जरांगे पुन्हा फडणवीसांवर घसरले!

हैदराबाद : ओवेसींविरोधात भाजप उमेदवार माधवी लता यांनी शड्डू ठोकला!

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

यावर समाज मध्यमामध्ये एकाने लिहिले आहे की, यांना एमएसपी आणि एमअरपी मधील फरक माहित नाही आणि पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघत आहेत. भाजप मीडिया पॅनेलच्या सदस्य चारू प्रज्ञा यांनी ट्विट केले, “राहुल जी खूप हुशार आहेत! त्यांना कमाल किरकोळ किंमत माहित नाही आणि त्याला छापील किंमत माहित नाही म्हणजे उत्पादन त्या किंमतीपेक्षा जास्त विकले जाऊ शकत नाही. कोणी तरी सांगा राहुल गांधी यांना की एमएसपी आणि एमआरपी भिन्न आहेत.
लेखक आणि भाजपचे प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी लिहिले, “गांधी भावंडांना एमएसपी, एमआरपी आणि जीएसटी यामध्ये तातडीने क्रॅश कोर्सची गरज आहे.

 

Exit mobile version