राहुल गांधींच्या चार पिढ्या आल्यातरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत!

केंद्रींय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर घणाघात

राहुल गांधींच्या चार पिढ्या आल्यातरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत!

विधासभेच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी सभेचा सपाटा लावला आहे. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप टीकेंची मालिका सुरु झाली आहे. आजपासून (८ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धुळे आणि नाशिकमध्ये सभा पार पडल्या तर मंत्री अमित शाह यांच्या सांगली जिल्ह्यातील सभा पार पडल्या. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आज पार पडलेल्या सभेत मंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सुरु असलेल्या कलम-३७० वादावर मंत्री अमित शाह यांनी मोठे भाष्य करत विरोधकांना ठणकावले आहे. राहुल गांधींच्या चार पिढ्या आल्यातरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाहीत, असे मंत्री शाह म्हणाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ५० वर्षांपूर्वी घेतलेले संकल्प भाजपाने पूर्ण केले. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी केवळ आश्वासने दिली, मात्र मोदी सरकार आल्यानंतर एका पाठोपाठ एक ते संकल्प पूर्ण झाले. राहुल गांधी यांचे वडील आम्हाला टोमणे मारायचे, ‘मंदिर बांधणार पण तारीख नाही सांगणार,’ असे ते म्हणायचे. अमित शाह ते पुढे म्हणाले, काँग्रेस-शरद पवार विरोध करत राहिले पण पंतप्रधान मोदींनी त्याच ठिकाणी प्रभू श्री रामांचे मंदिर उभे केले.

हे ही वाचा : 

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

मविआचे लोक शिव्या देण्यावर उतरलेत, महिलांनो सतर्क राहा!

तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

जम्मू-काश्मीरमधील कलम-३७० वर भाष्य करताना मंत्री अमित शाह म्हणाले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम-३७० हटवण्याचा प्रस्ताव ठेवला, संसेदेच्या समोर कायदा हातात घेवून मी उभा राहिलो तेव्हा राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, डीएमके हे सर्वजण विरोध करत होते. विरोधक म्हणत होते, कलम-३७० हटवू नका, असे करू नका, नाहीतर रक्ताचे पाट वाहतील. यावर उत्तर देताना मी म्हणालो, राहुल गांधी हे मोदींचे सरकार आहे, ‘रक्ताचे पाट तर सोडाच दगडफेकही करण्याची कोणाची हिंमत नाही’.

ते पुढे म्हणाले, आम्ही कलम-३७० हटवले, जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सरकार आली. दोन दिवसांपूर्वी कलम-३७० परत आणण्याचा तेथील विधानसभेत ठराव मंजूर झाला. पण मी तुम्हाला सांगून जातो, राहुल गांधी तुम्ही तर काय तुमची चौथी पिढी आली तरी कलम-३७० पुन्हा येवू शकत नाही. काश्मीर भारताचा आहे, यावर कोणीही बोट ठेवू शकत नाही, असे मंत्री अमित शाह म्हणाले.

 

Exit mobile version