राजस्थानातील पदयात्रा आता संपली असून २१ डिसेंबरपासून हरयाणात पदयात्रा सुरू होईल पण त्याआधी राहुल गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांना सूचना केली आहे. त्यानुसार आता या राज्यातील मुख्यमंत्री आणि कॅबिनेटची डोकेदुखी वाढली आहे.
राजस्थानातील टप्पा संपल्यानंतर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतास्रा यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक मंत्री, आमदार आणि कर्मचारी यांना हे सक्तीचे असेल की, त्यांनी महिन्यातून एकदा १५ किमी चाललेच पाहिजे. दोतास्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, सरकार आणि काँग्रेस पक्ष एकत्र काम करणार आहे. २६ जानेवारीला आम्ही यासंदर्भातील निर्णय घेऊ. १५ किमी चालण्यासंदर्भात आम्ही चर्चा करू. प्रत्येक मंत्री, आमदार, कर्मचारी आणि काँग्रेस संघटनेतील प्रत्येकाला हे सक्तीचे असेल.
हे ही वाचा:
चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
मस्करी नाही, मस्क ट्विटरचे सीईओपद सोडणार!
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य
अलवर येथील रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, राजस्थानात मिनी यात्रांचे आयोजन केले पाहिजे. मंत्रिमंडळात ३० मंत्री व ३३ जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्ह्याला एक मंत्री नियुक्त करा आणि त्यांना लोकांसोबत १५ किमी चालायला लावा.
दोतास्रा म्हणाले की, कुणाला मंत्री व्हायचे असेल, कुणाला आमदार व्हायचे असेल तर त्याने १५ किमी चालले पाहिजे. आम्ही हे होते आहे याची खातरजमा करू.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू झाली आहे. काश्मीरमध्ये ती संपणार आहे. त्याआधी आता ख्रिसमसच्या निमित्ताने काही काळ विराम देण्यात येणार आहे. त्यावेळी राहुल गांधी हे सुट्टीवर कुठे परदेशी जाणार का, यावरून चर्चा सुरू आहे. प्रत्येक नववर्षाच्या पूर्वसंध्येला ते परदेशात असतात, त्यावरून आता अंदाज बांधले जात आहेत आणि टीकाही होत आहे.