भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी आणखी दोन वर्षांचा करार करण्यास बीसीसीआय उत्सुक होती अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडकडे पुन्हा प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळताना भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्लूटीसी) आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले. गेल्या दोन वर्षांत प्रशिक्षक म्हणून द्रविड यांची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे वरिष्ठ संघासाठी द्रविड यांना कायम ठेवण्यास बीसीसआयने मान्यता दिली आहे.
क्रिकेट वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडची प्रशिक्षकपदाची मुदत संपुष्टात आली होती. पण सध्या भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षक नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून गेलेला आहे. पण अखेर राहुल द्रविडलाच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
आशीष नेहराला टी-२०चे प्रशिक्षकपद सोपविण्याचा विचार बीसीसीआयने केला होता पण त्याने नकार दिला. त्यामुळे बीसीसीआयने द्रविडकडेच विचारणा केली. तिन्ही क्रिकेट प्रकारात त्यानेच प्रशिक्षक म्हणून राहावे अशी विनंती करण्यात आली तेव्हा द्रविडने त्याला मान्यता दिली. सोबत त्याचा वर्ल्डकपमधील सगळा कोचिंग स्टाफही असेल.
हे ही वाचा:
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?
४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार
गेली दोन वर्षे द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघ खेळत आहे. त्यामुळे या संघातील एकूण वातावरण लक्षात घेता राहुल द्रविडनेच प्रशिक्षक म्हणून राहावे अशी बीसीसीआयची इच्छा होती. त्यासंदर्भात द्रविडशी संपर्कही साधण्यात आला होता. आता द्रविडने ती ऑफर स्वीकारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होत असलेली मालिका ही त्याची प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असेल. त्यात तीन वनडे आणि तीन टी-२० तसेच दोन कसोटी सामने यांचा समावेश असेल. २६ डिसेंबरपासून यातील कसोटी सामने सुरू होतील.
रवी शास्त्री हे प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर त्याजागी द्रविडची नियुक्ती झाली होती.