भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी आणखी दोन वर्षांचा करार करण्यास बीसीसीएस उत्सुक आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने संघाची जबाबदारी स्वीकारावी, अशी बीसीसीएलची इच्छा असून त्यासाठी सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जात आहेत.
मुख्य प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळताना भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्लूटीसी) आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले. गेल्या दोन वर्षांत प्रशिक्षक म्हणून द्रविड यांची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे वरिष्ठ संघासाठी द्रविड यांना कायम ठेवण्यास बीसीसीएल उत्सुक आहे.
‘बीसीसीएल सचिव जय शाह यांनी गेल्या आठवड्यात द्रविड यांच्याशी चर्चा केली. मात्र कराराचा अंतिम समुदा अद्याप तयार झालेला नाही,’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र बीसीसीआयला द्रविडने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी इच्छा असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र करारावर स्वाक्षरी झाली नसताना द्रविड दौऱ्यावर जातील का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा करार होईल, मात्र कसोटी मालिकाही तितकीच महत्त्वाची आहे. जर ते दक्षिण आफ्रिकेत टी २० मालिकेसाठी जाऊ शकले नाहीत तर, ते एकदिवसीय सामन्यांसाठी तरी जाऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अन्यथा मालिकेच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय ‘अ’ संघासह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील. मात्र लक्ष्मण हेदेखील विविध कामांमध्ये व्यग्र आहेत. सध्या लक्ष्मण यांच्याकडे एनसीएचा कार्यभार आहे. एनसीएमध्ये नव्या सुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याची देखरेख करण्याचे काम त्यांच्यावर आहे. तसेच, लवकरच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. तसेच, भारतीय ‘अ’ संघही दक्षिण दौऱ्यावर आहे.
हे ही वाचा:
‘रॅट होल मायनरनी’ वाचवला ४१ कामगारांचा जीव!
‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा
ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले
द्रविड यांनी अद्याप होकार कळवलेला नाही. द्रविड यांच्याकडे आधीच आयपीएल फ्रँचायझीमधील टीम डिरेक्टर, टीम मेन्टॉर म्हणून अनेक प्रस्ताव दाखल झाले आहेत. आयपीएलमध्ये अधिक पैसाही मिळतो, शिवाय यात तुलनेने कमी वेळही द्यावा लागतो.