राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!

एकतर सर्वांना समान रक्कम दिली पाहिजे, असे द्रविडचे मत आहे

राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!

India A coach Rahul Dravid (Photo by Mike Egerton/PA Images via Getty Images)

राहूल द्रविडने नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडूवृत्तीचे दर्शन आपणाला दिले आहे. त्याच्या निस्वार्थ खेळासाठी त्याला अनेक वेळा प्रशंसा मिळाली आहे. पुन्हा एकदा द्रविड यांनी आपल्या सज्जन व्यक्तिरेखेचे ​​उत्तम उदाहरण दिले आहे. टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघासाठी बीसीसीआयने १२५ कोटी रुपये बक्षिस जाहीर केले होते. ज्यामध्ये द्रविडला ५ कोटी रुपये मिळणार होते. मात्र द्रवीडने भारतीय क्रिकेट बोर्डाकडे बक्षिसाची रक्कम अडीच कोटी रुपयांवर आणण्यास सांगितले होते. कारण त्याला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकापेक्षा जास्त पैसे घ्यायचे नव्हते.

पाच कोटी ही रक्कम वर्ल्डकप चॅम्पियन आणि इतर भारतीय खेळाडूंना जाहिर केली होती. मात्र आता द्रविडने औदार्य दाखवत त्यातून केवळ अडीच कोटी रुपये घेतले आणि उर्वरित रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. उर्वरित कोचिंग स्टाफला प्रत्येकी अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत एकतर सर्वांना समान रक्कम दिली पाहिजे, असे द्रविडचे मत आहे. नाहीतर इतरांना मिळालेली रक्कम त्यांनाही मिळावी, असे ते म्हणाले होते. त्यामुळेच द्रविडने बीसीसीआयने दिलेल्या बोनसमधून अडीच कोटी रुपयांचा त्याग केला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’

वरळी हिट अँड रन प्रकरणी बारवर हातोडा!

अंबानींच्या कार्यक्रमात नाचलेले कसे चालते?

दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स होणार रद्द

राहुल द्रविडची ही पहिलीच वेळ नाही


यापूर्वी २०१८ मध्ये द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या अंडर-१९ संघाने विश्वचषक जिंकला होता. तेव्हाही द्रविडने असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी द्रविडला ५० लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफच्या इतर सदस्यांना प्रत्येकी २० लाख रुपये मिळणार होते. आणि संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये दिले जाणार होते. द्रविडने तेव्हाही ही रक्कम नाकारली होती. त्यामुळे बीसीसीआयला आपला निर्णय बदलावा लागला आणि सर्वांना समान रक्कम भरण्यास भाग पाडले.

Exit mobile version