राहुल द्रविडकडून रोहित शर्माचे कौतुक

कर्णधार, फलंदाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या योग्यपद्धतीने सांभाळत असल्याचे मत

राहुल द्रविडकडून रोहित शर्माचे कौतुक

भारताचा क्रिकेट संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करतो आहे. गटसाखळीतील आठ सामने जिंकून भारताने उपांत्यफेरीत धडक दिली आहे. या कामगिरीमुळे सर्वच भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कौतुक केले आहे. मात्र आवर्जून घेण्यासारखे नाव आहे ते कर्णधार रोहित शर्मा याचे.

 

सन २०११मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती, तेव्हा रोहितला संघात स्थान मिळवताही आले नव्हते. तो तडाखेबाज सलामीवीर आहे. त्याने सध्या विराट कोहली (५४३)च्या खालोखाल ४४२ धावा कुटल्या आहेत. ही सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. मात्र त्याची धावगती तब्बल १२२.७७ अशी अव्वल आहे. सलामीवीर म्हणून संघाचा पाया मजबूत करणे आणि कर्णधार म्हणून मैदानावर संपूर्ण संघाकडून चांगली कामगिरी करवून घेणे, या दोन्ही जबाबदाऱ्या रोहित समर्थपणे सांभाळतो आहे. त्यामुळेच खुद्द प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही रोहित शर्माचे कौतुक केले आहे.

 

‘त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर अशा दोन्ही ठिकाणी आदर्शवत उदाहरण समोर ठेवले आहे. त्याचे नेतृत्वगुणही वाखाणण्याजोगे आहेत. स्वतः खेळणे आणि संघाला आघाडीवर ठेवण्यात त्याने विलक्षण कामगिरी केली आहे. एका विशिष्ट प्रकारे खेळ करायचा, याबद्दल आम्ही चर्चा केली आहे. मात्र तुमचा कर्णधार खरोखरच पुढाकार घेऊन तसे प्रत्यक्ष करत नाही, तोपर्यंत तुम्ही ते साध्य करू शकत नाही. रोहितने ज्या प्रकारे याची अंमलबजावणी केली आणि जे करून दाखवले, ते पाहणे हा खरोखरच छान अनुभव आहे. रोहित अशी व्यक्ती आहे की जिला संघ आणि कोचिंग स्टाफचा आदर आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही रोहित ज्या पद्धतीने कार्यरत आहे, ते पाहून मी खूप आनंदलो आहे. रोहित खरोखरच अशी व्यक्ती आहे की जी त्याला मिळालेल्या सर्व यशास पात्र आहे,’ राहुल द्रविड रोहित शर्माचे कौतुक करताना थकत नाहीत.

 

हे ही वाचा:

लंडनमध्ये पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ मोर्चा!

मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!

हत्येतील मृत व्यक्तीनेच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले… ‘मी जिवंत आणि सुरक्षित आहे’

‘नरक चतुर्दशी’ आणि श्रीकृष्णाची नरकासुरावरच्या विजयाची गाथा; काय आहे कहाणी?

सलामीवीर रोहितच्या कामगिरीनेही प्रशिक्षक द्रविड खूष आहेत. ‘त्याने बर्‍याचदा वेगवान सुरुवात सुनिश्चित करून संघाचा पाया मजबूत केला आहे. त्याने सलामीला येऊन काही चांगल्या खेळी केल्या. त्यामुळे आमच्यासाठी पुढचा खेळ सोपा ठरला. संपूर्ण स्पर्धेत असे काही सामने होते की, ते आम्हाला अवघड ठरू शकले असते, परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्याने सलामीला येऊन, दमदार खेळी करून अक्षरशः आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे शेवटी विजय सहजसोपा झाला,’ असे द्रविड सांगतात.

 

‘अशा स्पर्धांमध्ये मधल्या फळीचे फलंदाज खूप महत्त्वाच्या असतात. आमच्या मधल्या फळीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे,’ असेही द्रविड यांनी सांगितले.

Exit mobile version