भारताच्या आगामी श्रीलंका विरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघणार आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख असणारे राहुल द्रविड हे जुलै होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यासंबंधीची घोषणा करण्यात आलेली आहे.
जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने असे या मालिकेत खेळवले जाणार आहेत. १३ जुलै ते २७ जुलै दरम्यान ही मालिका संपन्न होणार आहे. पण याच वेळी मुख्य भारतीय संघ इंग्लंडमध्ये असणार आहे. कारण तिथे भारताची इंग्लंड सोबत कसोटी मालिका आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ आणि इतर प्रशिक्षक वर्ग हा संघासोबत इंग्लंडमध्येच असणार आहे. अशावेळी श्रीलंका सोबतच्या मालिकेसाठी दौऱ्यावर जाणाऱ्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड जाणार आहेत.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर ती ब्रेकिंग न्यूज असेल
रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
लसीचा एक डोसही वाया घालवू नका, मोदींनी दिला कानमंत्र
काँग्रेसकडून मोदी सरकारची नव्हे, देशाची बदनामी
२०१८ साली राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारताने १९ वर्षाखालील खेळाडूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू हे सध्या भारत अ संघाचा भाग आहेत. हेच खेळाडू श्रीलंका दौऱ्यादरम्यान भारतीय संघाचा भाग असणार आहेत त्यामुळे या सर्वच संघासोबत राहुल द्रविड हे प्रशिक्षक म्हणून सर्वोत्तम पर्याय असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. तसेच दविड यांच्यासोबत युवा खेळाडूंचा असणारा ऋणानुबंध हा संघासाठी फायद्याचा ठरेल असेही बीसीसीआयचे म्हणणे आहे.