‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका

‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!

केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर टीका केली आहे. ‘रघुराम राजन आता राजकीय नेते झाले आहेत. ते मागून तेही अन्य कोणाची बाजू घेऊन वार करत आहेत,’ असे विधान वैष्णव यांनी केले आहे. रघुराम राजन यांनी नुकतेच भारतात ‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ (पीएलआय) योजनेंतर्गत मोबाइलची निर्मिती होत नसून केवळ या मोबाइलचे सुटे भाग येथे जोडले (असेंबल) जात आहेत, असा दावा केला होता.

‘जेव्हा चांगले अर्थतज्ज्ञ राजकीय नेते होतात, तेव्हा ते स्वत:ची आर्थिक समज गमावतात. रघुराम राजन असे राजकीय नेते बनले आहेत. त्यांनी उघडपणे समोर आले पाहिजे. निवडणूक लढली पाहिजे. निवडणूक घेतली पाहिजे आणि राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मागून वार करण्यात काही हशील नाही. ते कोणाच्या तरी वतीने लढत देण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका अश्विनी वैष्णव यांनी केली.कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रव्यापी भारत जोडो यात्रेदरम्यान रघुराम राजन काही काळ राजस्थानमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत चालत होते. या दरम्यान राहुल गांधी यांनी राजन यांची मुलाखतही घेतली होती.

 ही वाचा:

बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला

आशिया कप संघनिवडीसाठी रोहित शर्मा उपस्थित राहणार

रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो

जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात चांगल्या प्रगतीचा विश्वास
‘पुढील दोन वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक वाढीची नोंद करेल. लवकरच तीन कंपन्या भारतात जगभरातील देशांसाठी महत्त्वाच्या मोबाइल फोनच्या भागांची निर्मिती करेल,’ असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. ज्या कंपन्या मोबाइलनिर्मिती करतात, त्यांनीही टप्प्याटप्प्याने सुरुवात केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version