पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’

प्रतिष्ठित खिताब जिंकणारी पहिली भारतीय ठरली

पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’

भारताच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा किताब पटकावत इतिहास रचला आहे. ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल’ जिंकणारी रेचेल ही पहिली भारतीय ठरली आहे. २०१३ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत ७० देश सहभागी झाले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) पार पडली.

पंजाबमधील जालंधर येथील रहिवासी असलेल्या रेचेलने बँकॉक येथे झालेल्या या स्पर्धेत मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब जिंकून देशाचे आणि राज्याचे नाव उंचावले. या स्पर्धेत रेचेलने फिलिपाइन्सच्या क्रिस्टीन ज्युलियन ओपिएजाचा पराभव केला. त्याचबरोबर म्यानमारची थाई सु न्येन तिसऱ्या, फ्रान्सची सॅफिटो काबेन्गेले चौथ्या आणि ब्राझीलची तालिता हार्टमन पाचव्या स्थानावर राहिल्या. गेल्या वर्षीची ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल’ विजेती लुसियाना फस्टर हिच्या हस्ते रॅचेलला मुकुट घातला गेला.

हे ही वाचा : 

वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!

बाबा सिद्दीकी प्रकरणी अटक केलेला आरोपी सुजित सुशील सिंगकडून धक्कादायक माहिती उघड!

दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांची वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी!

काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!

दरम्यान, या स्पर्धेपूर्वी रेचेलने पॅरिसमध्ये सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड जिंकला होता. या स्पर्धेत ६० देशांतील ६० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. तसेच रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंडिया २०२४’ चा मुकुट जिंकला होता आणि त्यानंतर मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यासह राचेल गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, दररोज तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर रेचेलचे १ मिलियनहून अधिक चाहते आहेत.

Exit mobile version