25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषप्रज्ञानंद, बजरंग होणार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी

प्रज्ञानंद, बजरंग होणार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी

६३४ भारतीय खेळाडू घेणार सहभाग

Google News Follow

Related

आगामी आशियाई गेम्समध्ये विक्रमी ६३४ खेळाडू सहभागी होणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने शुक्रवारी यासाठी मंजुरी दिली. आशियाई गेम्सना २३ सप्टेंबरपासून चीनमधील होंगझोऊ येथे सुरुवात होईल. सन २०१८मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई गेम्समध्ये ५७२ खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ८५० खेळाडूंची शिफारस केली होती. या स्पर्धेत नुकताच बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये उपविजेता ठरलेला आर. प्रज्ञानंद आणि कुस्तीगीर बजरंग पुनियादेखील सहभागी होणार आहेत.

 

सर्वाधिक ६५ खेळाडू ‘ट्रॅक अँड फील्ड’ प्रकारात खेळतील. त्यात ३४ पुरुष आणि ३१ महिलांचा सहभाग असेल. आशियाई गेम्समधील ३८ स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २२ पुरुष आणि तितक्याच महिलांसोबत ४४ फुटबॉलपटू खेळण्यास जातील. तर हॉकीचे ३६ खेळाडू सहभागी होतील. त्यामध्ये प्रत्येकी १८ पुरुष आणि महिला असतील. १५ महिला आणि १५ पुरुषांसह ३० क्रिकेटपटू यात सहभागी होतील.

 

नौकानयनमध्ये ३३ आणि तिरंदाजीमध्ये ३० खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, हँडबॉल आणि रग्बीमध्ये एकही पुरुष स्थान मिळवू शकला नाही. तर, मार्शल आर्ट आणि वेटलिफ्टिंगमध्ये दोन महिलांना स्थान मिळाले आहे. जिम्नॅस्टमध्येही एकमेव महिला असेल.

 

हे ही वाचा:

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ

अमेरिकेला भारतीय वंशाचा अध्यक्ष मिळणार?

पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले

चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार

हंपी, हरिकाही खेळणार

क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटू बजरंग पुनिया (६५ किलो) यालाही यादीत सहभागी केले आहे. गेल्या महिन्यात बजरंग एशियाडचे सराव सामने न खेळताच पथकात निवडले गेले होते. कुस्तीपटू विशाल कालीरमन ६५ किलो वजनी गटात सराव सामन्यात विजयी ठरला होता. तेव्हा त्याने क्रीडा मंत्रालयाला स्वत:चे नाव संघात समाविष्ट करण्याची विनंती क्रीडा मंत्रालयाला केली होती. बजरंग पुनिया याने गुरुवारी जर खाप पंचायत त्याला आशियाई गेम्समध्ये खेळण्यास परवानगी देत नसेल, तर तो खेळणार नाही, असे जाहीर केले होते. तर, विनेश फोगट हिच्या जागी कुस्तीपटू अंतिम पंघाल (५३) हिचा समावेश करण्यात आला आहे. बुद्धिबळ विश्वचषक उपविजेता प्रज्ञानंदही या यादीत आहे. तो कोनेरू हंपी आणि डी हरिका यांच्यासोबत सहभागी होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा