भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबत आर अश्विनने स्वतः माहिती दिली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनची घोषणा झाली. रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट दरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला. अश्विनने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारली. अश्विनने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही बरीच वेळ चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. अश्विन आता ऑस्ट्रेलियात राहणार नसल्याची माहिती रोहित शर्माने पत्रकार परिषदेत दिली. आर अश्विन गुरुवारी (१९ डिसेंबर) भारतात परतणार आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना आर अश्विन म्हणाला, ‘मी टीम इंडियाच्या सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रूममध्ये खूप मजा केली. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मी बीसीसीआय, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. मी विशेषतः रोहित, पुजारा, रहाणे आणि कोहली यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी माझ्या चेंडूंवर अनेक अप्रतिम झेल घेतले. तो पुढे म्हणाला, ‘मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. यानंतर त्यांनी कोणताही प्रश्न विचारण्यास नकार दिला आणि घोषणा करून निघून गेले.
अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात ५३७ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने १५६ एकदिवसीय विकेट्सही घेतल्या आहेत. अश्विनने T२० मध्ये ७२ विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांच्या नावावर ७६५ विकेट्स आहेत. अश्विनने फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३५०३ धावा आहेत आणि त्याने एकूण ६ कसोटी शतके झळकावली आहेत.
हे ही वाचा :
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये सापडले शिवमंदिर; काय आहे इतिहास?
संभलमध्ये सापडलेल्या मंदिराजवळची अनधिकृत घरे लोक स्वतःच का पाडतायत?
बांगलादेशमध्ये जुलैपासून आवामी लीगच्या ४०० नेते, कार्यकर्त्यांचा मृत्यू!
सौदी अरेबियाच्या इशाऱ्यानंतर ४ हजार पाकिस्तानी भिकारी नो फ्लाय लिस्टमध्ये
अश्विनची कारकिर्दीत :
- अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०, ३०० आणि ३५० बळी घेणारा खेळाडू आहे.
- अश्विन हा भारतासाठी ५०, १००, १५०, २००, २५०, ३००, ३५०, ४००, ४५० आणि ५०० कसोटी विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू आहे.
- अश्विनने चार सामन्यांत एक शतक आणि पाच बळी घेण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे.
- अश्विन हा एका मोसमात सर्वाधिक ८२ बळी घेणारा खेळाडू ठरला आहे.
- अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावखुऱ्या फलंदाजांना बाद केले.
- अश्विनच्या नावावर भारतात सर्वाधिक ३८३ बळी आहेत.
- अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा खेळाडू आहे.
- अश्विनने दोनदा आशिया कप जिंकला, २०१० आणि २०१६ मध्ये तो चॅम्पियन टीम इंडियाचा भाग होता.
- २०११ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
- २०१३ मध्ये अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघात होता.
- अश्विन २०१६ मध्ये ICC पुरूष क्रिकेटपटू ठरला
- २०१६ मध्येच अश्विन ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर बनला होता.
- अश्विनला २०१५ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.
- अश्विनला २०११ ते २०२० या दशकातील कसोटी संघात स्थान मिळाले.