४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

मोहाली येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेच्या पहिल्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी अश्विनने श्रीलंकेच्या पथुम निसांकाचा बळी घेत कसोटीत आपल्या ४३४ विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अश्विनने आता माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सध्या हे दोन्ही गोलंदाज कसोटीत प्रत्येकी ४३४ विकेट घेणारे भारताचे दुसरे यशस्वी गोलंदाज ठरले आहेत.

लेगस्पिनर अनिल कुंबळे यांची भारताच्या कसोटी संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून ओळख आहे. अनिल कुंबळे यांनी ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. तर भारताचे माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी १३१ कसोटीत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. तर रविचंद्रन अश्विनने ८५ कसोटीत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३० वेळा पाच, सात आणि दहा विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत अश्विन सध्या नवव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन ८०० बळींसह अव्वल स्थानावर आहे.

हे ही वाचा:

बीएसएफ जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात सहा जवान ठार

पंतप्रधान मोदींनी मेट्रो प्रवासात दिव्यांग तरुणांशी मारल्या गप्पा

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण

‘दिशा, सुशांत प्रकरणाबद्दल बोलू नका सांगायला मुख्यमंत्र्यांचा दोन वेळा फोन’

पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत असून भारताने पहिला डाव ८ बाद ५७४ धावा करून घोषित केला. त्यानंतर फलंदाजीला आलेला श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ १७४ धावा उभारू शकला. त्यानंतर चांगली धावसंख्या फलकावर असताना भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला.

Exit mobile version