कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

मृत्यूच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

इस्लामचा तीव्र टीकाकार आणि अनेक वेळा सार्वजनिकरित्या कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिकचा नॉर्वेमध्ये मृत्यू झाला आहे.सलवान इस्लामचा टीकाकार होता आणि त्याने अनेक वेळा सार्वजनिकरित्या कुराण जाळले होते. अनेक सोशल मीडिया अकाउंट्स आणि मीडिया रिपोर्ट्स सलवानच्या मृत्यूचा असा दावा करत आहेत.मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सलवान मोमिकचा मृतदेह नॉर्वेमध्ये सापडला आहे. स्वीडनमध्ये निदर्शने करून कुराण जाळल्याने मोमिक प्रकाश झोतात आला होता.दरम्यान, इस्लामचा टीकाकार असलेल्या मोमिकने २०१८ मध्ये इराक सोडत स्वीडनमध्ये आश्रय घेतला होता. त्याने नुकतेच स्वीडन सोडून नॉर्वेमध्ये आश्रय घेतला होता.त्याने स्वतः याबाबत पोस्ट करून माहिती दिली होती.

हे ही वाचा:

देश पेटविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा देशातून सफाया करा!

सुनीता केजरीवाल होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री?

‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती विरुद्ध फारुख अब्दुल्ला

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४३ लाख रुपयांचे बक्षीस असणारे दोन नक्षलवादी ठार!

एका रेडिओ चॅनेलने मंगळवारी(२ एप्रिल) सोशल मीडियावर सलवान मोमिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले. मात्र, काही वेळाने या बातमीची पुष्टी होण्याची प्रतीक्षा आहे, अशी आणखी एक पोस्ट करण्यात आली. ज्या पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली होती ती आता काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोमिक गेल्या काही वर्षांपासून सतत इस्लामिक धार्मग्रंथ कुरानवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. तो काही वर्षांपूर्वी इराकमधून स्वीडनला पळून गेला होता आणि स्टॉकहोम परिसरातील सॉडेर्टाल्जे येथील जरना नगरपालिका क्षेत्रात राहत होता.त्याच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत.मात्र आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Exit mobile version