नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही!

आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याची वेगळीच चर्चा

नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही!

विधिमंडळात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी भटक्या कुत्र्यांचा विषय उपस्थित झाला आणि त्यावरून मग एकच धमाल पाहायला मिळाली.

भाजपाचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सर्वसामान्यांना सुटका हवी आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्याविषयी सरकारची काय भूमिका आहे, ही मागणी केली. मग हा विषय वेगळीकडेच वळला. यावर भाजपाचे आमदार नितेश राणे म्हणाले की, २०१९पासून सकाळी ९ वाजल्यापासून एका भटक्या कुत्र्याचा त्रास महाराष्ट्राला होत आहे. नसबंदी किंवा उपचार करणार आहे का.

हे ही वाचा:

काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंच्या हत्या थांबवायच्या आहेत? तर….

देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसे झाली आक्रमक

चक्क अभिषेक बच्चन, सैफ अली खान, हृतिक यांच्या नावांची पॅनकार्ड बनवून फसवले

मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडेवर रॉड, स्टम्पनी हल्ला

आमदार  बच्चू कडू तर म्हणाले की, भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये नेऊ टाका. त्यासंदर्भात समिती करा. ऍक्शन प्लॅन जाहीर करा. शहरात प्रयोग करा. रस्त्यावर आहेत ते आसाममध्ये न्यायला हवेत. तिथे या कुत्र्याला किंमत आहे. ८-९ हजाराला विकत घेतात. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा विचारलं की जसं इथे बोकड खातात तसे इथे कुत्रे खातात. एका दिवसात तोडगा निघेल. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कोपरखळी मारली. नितेश राणे यांच्या त्या मागणीबद्दल ते हसत हसत म्हणाले की, अनोळखी भटक्या कुत्र्यांबद्ल इथे काहीही कारवाई होणार नाही. तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारा. खाली बसा.

Exit mobile version