विश्वातील सर्व फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा थरार आजपासून म्हणजेच २ जुलै सुरु होत आहे. शुक्रवार, २ जुलै रोजी होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जीयम आणि इटली या चार संघांमध्ये सामना रंगणार आहे. तर विजयी होणारे दोन संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करणार आहेत.
१२ जून पासून युरो कप फुटबॉल स्पर्धेचे धुमशान सुरु झाले. खरं तर ही स्पर्धा २०२० सालीचा होणे अपेक्षित होते. पण कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. या स्पर्धेसाठी एकूण २४ संघ हे साखळी सामन्यांसाठी पात्र झाले असून यातले एकूण १६ संघ हे पुढल्या फेरीत दाखल झाले. तर नॉकआऊट स्वरूपाच्या राऊंड ऑफ १६ मधून एकूण ८ संघ हे उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले असून यापैकी ४ संघ हे उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत.
हे ही वाचा:
भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊत यांना जेवणच पचत नाही
‘मा.मुं.चे ज्ञान अगाध’ भातखळकरांचा टोला
तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?
सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जीयम, इटली, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, युक्रेन, इंग्लंड या आठ संघांपैकी चार संघ हे उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. या पैकी शुक्रवारच्या दोन सामन्यांमध्ये स्वित्झर्लंड विरुद्ध स्पेन हा सामना रात्री ९.३० वाजता रंगणार आहे तर रात्री १२.३० वाजता बेल्जीयम आणि इटली हे दोन तगडे संघ एकमेकांना भिडणार आहेत.
तर शनिवार, ३ जुलै रोजी होणाऱ्या सामन्यांमध्ये चेक रिपब्लिक संघाला डेन्मार्कचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंड आणि युक्रेन या दोन संघांमध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे या ८ संघांमधून नेमके उपांत्य फेरी कोण गाठणार याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांनी डोळे लावले आहेत.