25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषधारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले

धारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले

अजगराबाबत तातडीने कळवताच वन्यप्राणी संरक्षण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

Google News Follow

Related

धारावी येथील एका घरात शनिवारी सकाळी तब्बल १४ किलोंपेक्षा जास्त वजनाचा, ११ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथन हा अजगर आढळला. अजगराची ही मादी घरातील पाळीव सशाला गिळल्यानंतर घरातील फ्रिजच्या मागे लपली होती.

 

रुक्साना शेख यांच्या घरात हा अजगर आढळला. त्यांचा लहान मुलाला पहाटे तीनच्या सुमारास हा अजगर दिसला. विचित्र आवाज ऐकून मुलाला जाग आली आणि त्याने बॅटरी लावून पाहिले असता त्याला हा अजगर दिसला. त्याने घरात अजगर असल्याचे सांगताच घरातील सर्वांचीच पाचावर धारण बसली.

 

‘आमच्या दोन सशांपैकी एकाला सापाने पकडल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा आम्हाला आणखी वाईट वाटले. या सशाचे वजन अंदाजे दोन किलो होते,’ असे रुकसाना यांनी सांगितले. थरथरत्या हातानेच त्यातील एकाने दुरून एक व्हिडिओ शूट केला, ज्यामध्ये अजगराचे फुगलेले पोट दिसत होते. अजगराबाबत तातडीने कळवताच वन्यप्राणी संरक्षण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या विभागाचे अतुल कांबळे यांनी या अजगराला बाहेर काढले. मिठी नदी या घराच्या अगदी मागून वाहते, त्यामुळे हा अजगर येथूनच आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

 

‘घराच्या भिंतीला असलेल्या छिद्रातून साप आत शिरला असावा. सापाला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. हा अजगर आक्रमक आणि हल्ला करण्याच्या तयारीत होता. अर्थात, हे नैसर्गिक होते. कारण त्याने नुकतीच शिकार केली होती,’ असे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील वन्यजीव वाचवणारे कांबळे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

‘आयएनएस सुनयना’ची दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट

भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान

चेंबूरच्या अ‍ॅनिमल वेलनेस अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तपासणी करणाऱ्या डॉ. दीपा कात्याल ज्यांनी अजगराला तपासून त्याला ‘जंगलात सोडण्यासाठी योग्य’ असल्याचे प्रमाणपत्र दिले. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राचा एक भाग म्हणून केलेल्या एक्स-रेसाठी हा महाकाय अजगर हाताळणे हे महादिव्य होते, अशी कबुली त्यांनी दिली. ‘पोटात ताजे भक्ष्य असल्याने, अजगर सुस्त होता,’ असे डॉ. कात्याल यांनी सांगितले.

 

शनिवारी सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजगराला सोडण्यात येणार होते. मात्र शेख यांच्या धारावीच्या घरी दुपारनंतरही भीतीचे सावट होते. “फक्त मुलेच नाही तर आम्ही सगळेच घाबरलो आहोत,’ अशी कबुली रुक्साना शेख यांनी दिली. पहाटे तीनच्या सुमारास साप दिसला, तेव्हापासून आम्ही कोणीही साधी डुलकीही काढलेली नाही. माझा धाकटा मुलगा घरात यायला तयारच नव्हता. तो त्या दिवशी शाळेतही गेला नाही. दुपारपर्यंत दोन्ही मुले घरी येण्यासाठी घाबरत होती,’ असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा