आयकर कार्यालयावर अजगराची ‘रेड’

आयकर कार्यालयावर अजगराची ‘रेड’

काल उशिरा रात्री जुन्या आयकर विभागाच्या कार्यालय परिसरात अजगर आढळला होता. यावेळी वापरा संस्थेचे अध्यक्ष हाक्कीम शेख यांनी कार्यालयातून फोन करून अजगर आल्याची माहिती दिली होती. माहिती मिळताच सर्प मित्र अतुल कांबळे हे घटनास्थळी पोहचले होते.

आयकर विभागाची इमारत ही खूप जुनी असून, ती पाडण्याचे काम सुरु आहे. या इमारतीतील भंगार सामान बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बाहेर काढलेले भंगार सामान हे इमारतीच्या खाली ठेवले आहे. याच भंगार सामनाच्या आत अजगर दडून बसला होता. तिथे काम करत असलेल्या कामगाराला हा अजगर दिसला आणि कामगाराची एकच तारांबळ उडाली.

हाक्कीम शेख यांनी ही माहिती सर्प मित्र अतुल कांबळे याला दिली. सदरची माहीती मिळताच सर्प मिञ अतूल कांबळे हे घटनास्तळी पोहचले. अतुल कांबळे यांनी त्या अजगराला भंगार सामानातून बाहेर काढून एका पाईपच्या मदतीने त्या अजगराला पिशवीत बंद केले. त्यानंतर या अजगराला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची नोंद करण्यात आली. सोबतच वन विभागाच्या कंट्रोल रुमला या अजगराबद्दल माहिती देण्यात आली. हे अजगर सात फूट लांब आहे.

हे ही वाचा:

बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उध्वस्त करणारे ‘ऑपरेशन गरुड’

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

अजगराला कुठलीही इजा न होऊ देता त्याला सुरक्षितरित्या वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात आले. अजगर असलेल्या ठिकाणी मेट्रो लाइन ३ चे काम सुरु आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मशीनच्या कंपनामुळे हे अजगर आपल्या बिळातून बाहेर आले असावे अशी माहिती आहे. आपल्या आजूबाजूला परिसरात एखादा वन्य प्राणी किंवा साप आढळल्यास त्याला न मारता त्याची माहिती जवळच्या प्राणी मित्राला देण्यात यावी, अशी वन विभागाने सर्वांना विनंती केली आहे.

Exit mobile version