बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनमध्ये बाजी

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनमध्ये बाजी

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने प्रथमच सिंगापूर ओपनच विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे सिंधूने फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झी.यी वांगचा पराभव केला आहे. तसेच या मोसमातील तिचे हे तिसरे विजेतेपद आहे. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर ५०० विजेतेपदाची विजेती ठरलीय.

पहिल्यांदाच पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत चीनच्या झी.यी. वांगची २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे. सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूने वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट वांगने जिंकला. मात्र, अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं बाजी मारली आहे. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने यावर्षी सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर ३०० विजेतेपद पटकावले आहेत. ३२ मिनिटे चाललेल्या उपांत्य फेरीत तिने २१-१५,२१-७ असा विजय नोंदवला होता. याशिवाय पीव्ही सिंधूने यावर्षी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकही जिंकले होते.

हे ही वाचा:

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं कॉमनवेल्थ गेम्ससाठी जाहीर केलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

Exit mobile version