ऑलिम्पिक २०२४; पहिल्या सामन्यात पीव्ही सिंधूचा दणदणीत विजय !

मालदीवच्या खेळाडूचा पराभव

ऑलिम्पिक २०२४; पहिल्या सामन्यात पीव्ही सिंधूचा दणदणीत विजय !

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिकच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरली आहे. पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या एम ग्रुपमध्ये मालदीवच्या फथिमथ नब्बा अब्दुल रझाकचा पराभव केला आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या या भारतीय सुपरस्टार खेळाडूचा यावेळी तिसरे पदक जिंकून इतिहास रचण्याचा मानस आहे. सिंधूने पहिला गेम २१-९ असा जिंकला तर दुसरा गेम २१-६ ने जिंकला. सिंधूने अवघ्या २७ मिनिटांत हा सामना संपवला.

पीव्ही सिंधूने मालदीवच्या अब्दुल रज्जाकविरुद्धचा पहिला सामना सहज जिंकला. पहिला गेम अवघ्या १३ मिनिटांत २१-९ असा जिंकला तर दुसरा गेम १४ मिनिटांत संपला. पीव्ही सिंधूने दुसरा गेम २१-६ असा जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता सिंधूचा पुढच्या फेरीचा सामना ३१ जुलै रोजी इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबा बरोबर होणार आहे. हा सामना जिंकला तर सिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल.

हे ही वाचा..

नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जींची नौटंकी

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार!

सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

विधानपरिषदेतील नवनिर्वाचित ११ उमेदवारांनी घेतली शपथ !

दरम्यान, पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहेत. जर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने पदक जिंकले तर पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरेल.

Exit mobile version