टोक्यो ओलिम्पिकमध्ये बॅडमिंटन कोर्टवर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवलं आहे. या विजयासह सिंधूने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
सिंधूने पहिला सामना २३ मिनिटांत संपवला. सामना तिने २१-१३ च्या फरकाने खिशात घातला. सुरुवातीपासून सामन्यात दोघींमध्ये चांगली चुरस दिसून आली. दोघीही ६-६ च्या स्कोरवर असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट अटीतटीचा झाला. ५६ मिनिटं चाललेल्या दुसऱ्या सेटमध्ये यामागुचीने पुनरागमन करत १६-१६ ने बरोबरी साधली. पण अखेर सिंधूने पुन्हा पुनरागमन करत सामना २२-२० ने विजय जिंकला.
टोक्यो ओलिम्पिकमध्ये बॅडमिंटन कोर्टवर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवलं आहे. या विजयासह सिंधूने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
हे ही वाचा:
कृणाल पांड्यापाठोपाठ ‘या’ दोन खेळाडूंनाही कोरोना
फडणवीस-ठाकरे भेट का झाली? कुठे झाली?
मुलं जन्माला घाला आणि पैसे घ्या योजना
पीव्ही सिंधूने आता सेमीफायनलमध्ये जागा मिळवली असून सेमीमध्ये तिची लढत अजून कोणासोबत असेल हे नक्की झालेले नाही. आता थायलंडच्या रत्नाचोक आणि चीनी ताइपेची ताई त्जु यिंग यांच्यात उपांत्यूपूर्व फेरीचा सामना होणार असून यातील विजेत्यासोबत सिंधू सेमी फायनलचा सामना लढेल. सिंधूसाठी चीनी ताइपेच्या खेळाडूसोबत सामना लढणे अवघड असणार आहे. कारण दोघी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात सिंधू केवळ ५ सामने जिंकली असून ताई त्जु यिंगने १३ सामने जिंकले आहेत.